मुले पळविणारी टोळी आली या अफवावर विश्वास ठेवु नका ;संशय असल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधा पोलीस अधीक्षक यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 September 2022

मुले पळविणारी टोळी आली या अफवावर विश्वास ठेवु नका ;संशय असल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधा पोलीस अधीक्षक यांचे आवाहन

 औरंगाबाद : ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवासापासुन सोशल मिडीयाचे माध्यमांतुन मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, तसेच वाहनातुन मुलांचे अपहरण केले आहे अशा स्वरूपाच्या अनेक अफवाचे पेव फुटले आहे. या अफवामुळे नागरिक कोणतीही खातरजमा न करता अशा अफवांवार विश्वास ठेवु अशा प्रकारचे संदेश, व्हिडीओ किल्प या सोशल मिडीयावर सरास पुढे  फॉरर्वड करण्यात येत आहे.

 दिनांक 20/9/2022 रोजी  सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे अतंर्गत पळशी या गावातुन एक शाळकरी मुलाचे मारूती ओमनी वाहनातुन अपहरण केल्याची माहिती ही सिल्लोड ग्रा. पोलीसांना मिळाली. पोलीसांनी तात्काळ प्रतिसाद देत मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे सुचना प्रमाणे संपुर्ण जिल्हयात नाकाबंदी  केली तसेच बुलढाणा, जालना, जळगाव, औरंगाबाद शहर, अहमदनगर, या जिल्हा सिमा वरती तात्काळ नाकाबंदी करण्यात येवुन मोठया प्रमाणावर वाहनाची तपासणी सुरू केली होती. यावेळी मिळालेल्या वर्णनाच्या वाहनाशी मिळते जुळते दोन वाहने पोलीसांनी संशयीत म्हणुन थांबविली होती. त्यांची कसुन चौकशी सुध्दा करण्यात आली. पोलीसांचे एक पथकाने पळशी ता. सिल्लोड येथे जावुन त्याशाळेच्या हजर व गैरहजर विद्यार्थाची माहिती संकलित केले असता सर्व विद्यार्थी हे बरोबर असुन कोणताही मुलगा मिसींग नसुन कोणत्याही मुलांचे अपहरण झाले नसल्याचे पोलीसांचे चौकशीत निष्पन्न होऊन ती केवळ एक अफवा असल्याचे समोर आले आहे. तरीही पोलीसांनी अशा घटनेला जलद प्रतिसाद देत मुलाची शोध घेण्यास सर्व यंत्रणा सर्तक पणे कार्यन्वित केली होती.

 अशाच प्रकारे दिनांक 21/9/2022 रोजी  पोलीस ठाणे वडोदबाजार अतंर्गत आळंद येथे पांढ-या रंगाची सुमो ही मुलांचे अपहरण करण्यासाठी फिरत असल्याची माहिती वडोदबाजार पोलीसांना मिळाली तिथेही पोलसांनी विनाविलंब तात्काळ प्रतिसाद देत आळंद परिसरात मिळालेल्या वर्णनाच्या वाहनाचा शोध घेतला असता तिही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे कि, औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात कुठेही लहान मुले पळवुन नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही.  जिल्हयात अशा प्रकारे सोशल मिडीयाचे माध्यमातुन या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवुन नये किंवा भिती बाळगु नये. जिल्हा पोलीसांनी  या अफवेची  शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे. शाळा, महाविद्यालय, परिसरात पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सर्तक असुन अशा घटनांना जलद प्रतिसाद दिला जातो त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती बाळगु नये. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घर गल्ली, किंवा परिसरात संशयास्पद अनोळखी व्यक्ती, वाहन, आढळल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. स्वत:हुन अशा संशयास्पद व्यक्तीस मारहाण अगर वाहनास तोडफोड, करु नये कायदा हातात घेऊ नये.

  जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडीओ, संदेश, विनाकारण व्हायरल करून जाणीवपुर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळुन आल्यास त्याचे विरूध्द सक्त कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल. 


 

No comments:

Post a Comment

Pages