नांदेड दि. 23 :- राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार 26 सप्टेंबर 2022 रोजी सायं. 6.15 वा. नांदेड येथे आगमन व मुक्काम. मंगळवार 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 38 विभागाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक व सेतु सुविधा / आपले सरकार सेवा केंद्रास भेट व मुक्काम. बुधवार 28 सप्टेंबर 2022 सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा परिषद सभागृहात सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी जि.प.खाते प्रमुख यांची बैठक व सायंकाळी लातूरकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment