देशातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासींवरील अत्याचाराविरोधात आंबेडकरवादी संघर्ष समितीचा 14 सप्टेंबर ला स्वाभिमान मार्च - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 7 September 2022

देशातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासींवरील अत्याचाराविरोधात आंबेडकरवादी संघर्ष समितीचा 14 सप्टेंबर ला स्वाभिमान मार्च

औरंगाबाद : आज सुभेदारी विश्रामगृह येथे आंबेडकरवादी संघर्ष समितीची बैठक पार पडली त्या बैठकीत देशभरातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक,आदिवासीच्या होणाऱ्या हत्या व अत्याचाराच्या घाटनाच्या निषेधार्थ 'स्वाभिमान मार्च ' दि.१२ सप्टेंबर ला काढण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते


पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ह्यांनी आज दि.६ सप्टेंबर रोजी  समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वाभिमान मार्च पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यावरून दि.१२ सप्टेंबर चा स्वाभिमान मार्च स्थगित करून १४ सप्टेंबर रोजी भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालय ह्या मार्गावर स्वाभिमान मार्च काढण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने अध्यक्ष श्रावण गायकवाड ह्यांनी कळविले आहे.

पिसादेवी येथील जनार्धन कासारे ह्यांची निर्घृणपणे झालेली हत्या,खिर्डी,खुलताबाद येथील किरण चव्हाण ची हत्या,म्हाळशी सेनगाव येथील दिक्षा वाठोरे ची विषपाजून केलेली हत्या,बिलकीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांची कोर्टाने केलेली सुटका,इंद्र मेघवाल ह्याची झालेली हत्या,धुळे येथील बहिष्कार असे अनेक प्रकार राजरोसपणे घडत असताना सरकार व प्रशासन ह्यावर ब्र शब्द सुद्धा काढत नाही उलट आंदोलकांवर दडपशाही केली जात असल्याने ह्या  मार्च च्या माध्यमातून आंबेडकरी जनतेचा स्वाभिमान चेतवणे व जनआंदोलन उभे करून राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्याची पूर्वतयारी म्हणून स्वाभिमान मार्च काढण्यात येत आहे.

तरी मोठ्या संख्येने ह्या स्वाभिमान मार्च मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बाळू गंगावणे,संतोष मोकळे,आनंद कस्तुरे,वसंतराज वक्ते,महेश तांबे,बलराज दाभाडे, गौतम गणराज,राहुल साळवे,रामदास ढोले,ज्ञानेश्वर ढोले,दिपक निकाळजे,बाळू वाघमारे,रतन साळवे,विलास पठारे,सुभाष ठोकळ,आनंद लोखंडे, कमलेश चांदणे,तुषार आदके,कपिल बनकर,रामराव नरवडे,नवल सूर्यवंशी,राहुल जाधव,राजु उजगरे,राजाभाऊ उघडे,श्याम तुपे,सचिन शिंगाडे,गौतम भिसे,नागेश केदारे,अरुण त्रिभुवन,राहुल भालेराव,प्रवीण सोनकांबळे,राजेश भारसाखळे,हर्षवर्धन प्रधान,प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे,प्रवीण बोर्डे,अजित पाल,सम्यक सरपे,सनी देहाडे,किरण शेजवळ,सुमित नावगिरे,रवि बोर्डे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages