औरंगाबाद:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागामध्ये दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी ,अमेरिका - भारत द्विपक्षीय संबधांवर चर्चा झाली.यामधे रॉब अँडरसन,( कल्चरल अफेअर्स ऑफिसर्स, यु.एस कॅन्सल्ट जनरल,मुंबई) तसेच अल्मित्रा किका,(पब्लिक डिप्लोमसी स्पेशालिस्ट, यु.एस कॅन्सल्ट जनरल,मुंबई) याशिष्ट मंडळांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला, प्रारंभी अल्मित्रा किका यांनी अमेरिका -भारत संबंधातील भाषा,कला व सांस्कृति आदी बदलत्या सकारात्मक संबंधावर चर्चा केली. तर रॉब अँडरसन म्हणाले की, भारतीय राज्यघटनानिर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. तसेच सामाजिक न्याय स्थापन करण्याच्या भूमिकेतून अनेक आव्हानाचा सामना करत भारतीय लोकशाही उभी राहिली , भारत मोठी बाजारपेठ व अर्थव्यवस्था आहे.ते पुढे म्हणाले की . अमेरिकेने भारताला विविध क्षेत्राच्या विकासात मदत केली आहे व करत आहे. भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी विविध संधी उपलब्ध आहेत व त्यासाठी अमेरिका कटिबध्द राहील , शिवाय भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा संदर्भात येणाऱ्या अडचणी आम्ही दूर करत असून अमेरिकेत शिकण्यासाठी व नोकरीसाठी ईछुक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत आम्ही शैक्षणिक आदान प्रदानावर भर दिला आहे.आज विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख ,डॉ शुजा शाकीर यांनी केले.तर संवादाचा सार प्राध्यापक व मानव्यविद्याशाखा अधिष्ठाता ,डॉ.प्रशांत अमृतकर यांनी मांडला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सत्यपाल कांबळे,डॉ. बालासाहेब कीलचे,डॉ.सविता नागे,नितीन केदारे,महेश शिंदे,विजय सले आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment