पाथरी येथील संजय उजगरे यांचा पँथर्स च्या सुवर्ण महोत्सवात विशेष सन्मान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 September 2022

पाथरी येथील संजय उजगरे यांचा पँथर्स च्या सुवर्ण महोत्सवात विशेष सन्मान

 नांदेड,जय भोसीकर : 

दलित पँथर गौरव समिती नांदेड आयोजित "महाराष्ट्रातील पॅथरर्सचा  गौरव सोहळा" विशेष सन्माना साठी  संजय ऊजगरे पाथरी जि. परभणी यांची निवड करण्यात आली आहे.

  गेल्या 20 ते 25 वर्षापासून सामाजिक, धार्मिक, वंचितांच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रवाहात शिकलगार, आणि अल्प संख्याक दुर्बल, कुरेशी/खाटीक समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात दै. प्रजासत्ताक भारताचा शिल्पकार वृत्तत्रातुन प्रतिनिधित्व  केले, लाॅर्ड बुध्दा टि. व्ही माध्यमातून मराठवाड्याचे प्रतिनिधी होते.  जनहित मजदूर संघटनेच्या माध्यमातून प्रमुख भूमिका बजावली, मूफ्टा  शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय "महात्मा क्रांतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2015 ने सन्मानित करण्यात आले होते, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात लोकसहभागातून  सांय. 6ते9 वेळेत वाॅर्ड गल्ली गाव तिथं अभ्यासिका हा शासनाचा उपक्रम स्विकारून संपूर्ण परभणी जिल्ह्यात लागु केला. थिंक टॅंक ग्रुपच्या माध्यमातून. मा. आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार प्रसारासाठी प्रयत्न करून समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य चालू आहे. तसेच समाजाच्या सहयोगातुन प्रमुख "बुध्दीस्ट मंगल परिणय" विनाशुल्क  कार्यान्वित आहेत.अश्या  विविध कार्याची दखल घेऊन दलित पँथर सुवर्ण महोत्सवात  14 ऑक्टोबर 2022 रोजी नांदेड येथे त्यांचा  विशेष  सन्मान करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages