युवक महोत्सवात जलस्यातून भिम विचारांचा जागर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 October 2022

युवक महोत्सवात जलस्यातून भिम विचारांचा जागर


 औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब दावेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या युवक महोत्सवात महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची जागर कलावंतांनी जलसा या कलाप्रकारातून सादर केला.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात दि.18 रोजी मंच क्र.5 वर सत्यशोधकी,आंबेडकरी जलस्यातून स्पर्धकांनी महामानवांचे विचार कार्य प्रबोधनात्मक गायनाच्या माध्यमातून मांडले. 

                 कॉलेज कोड क्र. 155 विवेकानंद महाविद्यालयाच्या स्पर्धेकांनी "दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर" हे महापुरुषांची महती सांगणारे वंदन गीत सादर केले. "माझ्या भिमाची नजर होती पुस्तकावर",सांगा आम्हाला बिर्ला- बाटा- टाटा कुठं हाय हो..? ,भिम मोत्याचा हार गं माय, असा बाबासाहेब आंबेडकरांची कार्य कुशलता सांगणारा जलसा सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

आंबेडकरी जलस्यातुन  महामानव डॉ बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर शेतीविषयक ,नदीजोड प्रकल्प अश्या ,भारतीय संविधान  अश्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल बतावणी सादर केली.

बोधी वृक्षा खालचे लोक मोदी वृक्षा खाली आकर्षित होत आहेत. चळवळीच्या दृष्टीने हे चिंतेची बाब आहे हे वास्तवता  विवेकानंद महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी जलस्यातून मांडली.

  या कलाप्रकाराला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment

Pages