औरंगाबाद :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव-२०२२ मध्ये विद्यार्थ्यांकडून सादर होणाऱ्या कालप्रकारावर जाणीवपूर्वक आक्षेप घेऊन काही धर्मांध संघटना विद्यापीठ परिसरात घोळक्याने फिरून,धर्मांध घोषणा देऊन विविध जिल्ह्यातुन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्न,अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा ह्यावर भाष्य करणारे,नाट्य,चित्र,देखावे,कविता सादर करणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे.
परंतु आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप,बजरंग दल व कथित हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते धार्मिक भावना दुखावल्याचा आव आणत उत्सवाच्या वातावरणावर विजरण टाकून वातावरण दूषित करत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांत दहशत निर्माण झाली असल्याने ह्या प्रकारणी तात्काळ पोलिसांना पाचारण करून टोळक्याने फिरणाऱ्या धर्मांध संघटनेच्या कार्यकर्त्यांना,पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे अन्यथा रिपब्लिकन विद्यार्थी सेना त्यास जशासतसे उत्तर देऊन त्यांना पिटाळून लावेल असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सचिन निकम ह्यांनी कुलगुरू ह्यांना भेटून देण्यात आला आहे.
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सदरील मागणीचे निवेदन कुलगुरूंना मेल द्वारे पाठविण्यात आले.
ह्यावेळी सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,कुणाल भालेराव,अॅड.अतुल कांबळे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment