कवी, गीतकार यांनी जबाबदारीने लिहावे.. डॉ ऋषिकेश कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 18 October 2022

कवी, गीतकार यांनी जबाबदारीने लिहावे.. डॉ ऋषिकेश कांबळे

औरंगाबाद :

भीमराव कर्डकांचा जसला बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की माझी 10भाषण आणि शाहीरांचा एक जलसा समान आहेत, त्या गितामध्ये सामर्थ्य होते परिवर्तनाचे म्हणून कवी गीतकार यांनी आपली जबाबदारी ओळखून लिखाण केले पाहिजे त्याकरीता त्यांची प्रशिक्षण वर्ग झाले पाहिजे असे आग्रही मत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ भाष्यकार विचारवंत ऋषिकेश कांबळे यांनी वामनदादा - प्रतापसिंग प्रेमिंचे विचार मंथन संमेलनात व्यक्त केले. 

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्त आयोजित काव्य स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा व वामनदादा - प्रतापसिंग प्रेमिंचे विचार मंथन संमेलन आंबेडकर संशोधन केंद्र, कीले अर्क, आमखास मैदान, औरंगाबाद येथे संपन्न झाले. 

या संमेलनात शाहीर,कवी, गायक, कलावंत यांचे साहित्य संवर्धन, समस्या आणि उपाय या विषयावर खुले चर्चासत्र डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे मार्गदर्शनात व ॲड. सर्वजीत बनसोडे, अण्णा बोदडे, डॉ. राजाभाऊ भैलूमे, रमेश शिंदे, सुनील वाकेकर, डॉ. मिलिंद बागुल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी 10 कलमी कृती कार्यक्रमासाठी आराखडा जाहीर करण्यात आला. 

यावेळी सर्व जुन्या नव्या गीतकरांचे साहित्य संवर्धन करणे आवश्यक आहे, त्यांचा इतिहास लिहिणे आवश्यक आहे. बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने लोकगीतांतून लोकांपर्यंत पोहचवली. म्हणून हे लोकगीत संकलित करण्यासाठी निमंत्रक समिती नेमण्यात आली. 

या चर्चा सत्रात खुले पणाने चर्चा करण्यात आली. ज्यात सूनिताताई माधवराव गायकवाड,, डी. आर. इंगळे,योगीराज बागुल, भीमराव हाटकर, सुदाम सोनुले, डॉ. मुंजाजी इंगोले, डॉ. श्याम जाधव, ॲड. हेमंत मोरे, ॲड. विशाल धुंदले, हेमंत भाऊसाहेब बी  एस. मोरे आणि अनेक मान्यवर यांनी आपल्या भूमिका मांडल्या. 


यावेळी जलसाकार प्रभाकर गवई यांचे पुत्र जगन गवई, गोपीनाथ मिसाळ यांचे चिरंजीव मंगल मिसाळ, जनार्दन गवई यांची पत्नी वच्छला बाई  आणि पुत्र संजय गवई यांची उपस्थिती होती. 

यावेळी जनार्दन गवई यांची पत्नी वच्छला बाई आणि माधवराव गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व वामनदादांचे सहकारी, कलावंत, गायक इत्यादींना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. 


कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमेश आराख आणि आभार राहुल खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

प्रा. डॉ. किशोर वाघ, राहुल खांडेकर,संदिप वाकोडे, प्रा. प्रमोद राजंदेकर, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, रमेश आराख,हर्ष स्थूल, सौरभ गाणार, ॲड. मिलिंद डूमने, अमोल कांबळे, आनंद रगडे, विशाल म्हस्के. नागसेन वानखडे, ...तायडे, ..इत्यादींनी अथक परिश्रम केले

कार्यक्रमाचे आयोजन बहुजन संघटक सोशल मिडिया,पुणे

 संबोधी साहित्य संघ,मुर्तिजापूर यांनी केले होते. 

"महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय काव्यस्पर्धा" 2022 चा निकाल


अमोल कदम, मुंबई,

वामनदादा

प्रथम पुरस्कार - महाकवी वामनदादा कर्डक काव्य पुरस्कार,ग्रंथ,  सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 3000/- रुपये


नंदकिशोर दामोधरे, अमरावती

वामन

🏆द्वितीय पुरस्कार - शाहीर प्रतापसिंग बोदडे पुरस्कार...रोख रक्कम 2000/- रुपये, ग्रंथ,  सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र


अनंता मिसाळ, भादोला

वामनवानी 

🏆तृतीय पुरस्कार - जलसाकार गवई - मिसाळ भादोलेकर पुरस्कार...1000/- रुपये, रोख रक्कम, ग्रंथ,  सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र


उत्तेजनार्थ

प्रा. सागर कांबळे, पुणे

कार्यकर्ता


प्रा. डॉ. अरविंद पाटील, वर्धा

भारतीय


सुमेध वानखेडे, अकोला 

जात


शुभांगी  गावंडे, भंडारा

आम्ही सावित्रीच्या लेकी


सुमेध साळवे, जळगाव

सांग तुला बुद्ध हवा की बुद्ध


किरण नाळे, पुणे

 वंदन सवित्रिस 


मधुकर वारभुवन, मुंबई

वामनधन


अशोक वासाटे, किनवट

स्वातंत्र्य अबाध राखू

No comments:

Post a Comment

Pages