औरंगाबाद :
सरदार वल्लभभाई पटेल याचा जन्मदिन दि. 31 ऑक्टोंबर हा "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून "राष्ट्रीय एकता दौड" (UNITY RUN) व फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, औरंगाबाद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7.00 वाजता मानवी साखळी तयार करून एकता दौड (UNITY RUN) व आजादी का अमृत महोत्सव फीट इंडिया फ्रीडम रन (3.00 कि.मि.) करणेकरीता विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल याच्या प्रतिमेस प्रमुख पाहूणे मा. डॉ. भागवत कराड,केंद्रीय अर्थ राज्य मंत्री,भारत सरकार, नवी दिल्ली व मा. जिल्हाधिकारी, औरंगाबाद श्री. आस्तिककुमार पांडेय, भाप्रसे, यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून " एकता दौड" (UNITY RUN) व फिट इंडिया फ्रिडम रनची सुरूवात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
सदर कार्यक्रमांचे प्रास्ताविक मा. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. चंद्रशेखर घुगे यांनी केले. मा. डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री,भारत सरकार, नवी दिल्ली व मा. जिल्हाधिकारी, औरंगाबाद श्री. आस्तिककुमार पांडेय, भाप्रसे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी एकता व समानतेने राहण्याकरीता उपस्थितांनी "राष्ट्रीय एकता" ची शपथ मा.ना.श्री. भागवत कराड यांनी दिली. सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे याकरीता किमान अर्धा तास तरी नियमित चालणे किंवा धावणे हा उद्येश समोर ठेवून फिट इंडिया फ्रिडम रन च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
No comments:
Post a Comment