पी. एचडी संशोधक विद्यार्थ्यांचे 1 नोव्हेंबरला पुणे येथे आंदोलन ; हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे -भिमराव मोटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 31 October 2022

पी. एचडी संशोधक विद्यार्थ्यांचे 1 नोव्हेंबरला पुणे येथे आंदोलन ; हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे -भिमराव मोटे


औरंगाबाद :                                                           

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था 'बार्टी' पुणे कडून अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. परंतू पी. एचडी संशोधक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून जवळपास दीड वर्ष संपत आले तरी विद्यार्थांना फेलोशिप न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बार्टी कडून घेण्यात येणारी लेखी परीक्षा व मुलाखत रद्द करून केवळ कागदपत्रांची पडताळणी करून २०२१ मधील पात्र विद्यार्थ्याना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. या मागणीसाठी  दिनांक 1 नोव्हेंबर रोजी बार्टी कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थी कृती समतीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असुन महाराष्ट्रातील तमाम संशोधक विद्यार्थ्यांनी हजारोच्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन भिमराव मोटे यांनी केले आहे.

            संशोधन करून चांगले करिअर करता येईल या उद्देशाने अनेक गरीब घरातील संशोधकांनी विद्यापीठात प्रवेश घेतले आहेत. पूर्णवेळ पी.एचडी करत असल्यामुळे त्यांना ही फेलोशिप मिळणे महत्त्वाचे ठरते. 

         केंद्र शासनाने नुकतंच २०२० मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला प्राधान्य देण्यात आले आहे. संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आदर्श समाज निर्मिती करणे हा कदाचित शासनाचा मानस असावा. आज घडीला संशोधनाच्या माध्यमातून समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांवर फेलोशिप अभावी उपासमारीची वेळ आली आहे.  कारण जवळपास 90 टक्के विद्यार्थी हे अल्पभूधारक शेतकऱ्यांची व मजुरांची मुलं आहेत. बार्टी पुणेच्या या वेळखाऊ धोरणामुळे मागील १५ महिन्यांपूर्वी RAC होऊनही संशोधक विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित राहिले आहेत त्यामुळं तो आर्थिक संकटात सापडला आहे. संशोधक विद्यार्थी हे संबधित विद्यापीठाकडून घेण्यात येणारी पी.एचडी पात्रता परीक्षा, तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कोर्स वर्क परीक्षा उत्तीर्ण होऊन आल्यानंतरही आणखी बार्टी कडून कोणती वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे? त्यामुळे बार्टी कडून घेण्यात येणारी लेखी परीक्षा व मुलाखत तत्काळ रद्द करून ज्याप्रमाणे सारथी व महाज्योती ही संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देते त्या प्रमाणे बार्टी, पुणे नी सुद्धा अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मंजूर करावी. यानंतर सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा फेलोशिप अदा करावी. या प्रमूख मागणीसाठी अनेक संशोधक विद्यार्थी 1 नोव्हेंबर पासून बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत, तर त्यांच्या समर्थनात राज्यभरातून हजारो विद्यार्थी पुणे येथे दाखल होणार आहेत. बार्टीने 2021 मधील 200 जागांची अट रद्द करून पात्र संशोधक विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करून सरसकट फेलोशिप मंजुर करावी या मागणी साठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे भिमराव मोटे यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

Pages