हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 October 2022

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

नांदेड  दि. 21 :-  पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार रब्बी सन 2022-23 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबी, केळी व आंबा या अधिसूचित पिकाकरीता महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. स्टॉक एक्चेंच टॉवर्स मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. 


अंबिया बहार रब्बी विमा हप्ता दर पुढील प्रमाणे आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 80 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 4 हजार 400 आहे. केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख 40 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 8 हजार 400 आहे. आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख 40 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 23 हजार 100 आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढील प्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. मोसंबी फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात मालेगाव, कंधार तालुक्यातील बारुळ, फुलवळ, कंधार. नांदेड तालुक्यातील लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर. मुदखेड तालुक्यातील बारडचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रकार अवेळी पाऊस, जास्त तापमाण, जास्त पाऊस, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर, 1 ते 31 मार्च, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर, 1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे आहे.  


केळी फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात दाभड, मालेगाव. उमरी तालुक्यात उमरी. किनवट तालुक्यात इस्लापूर, शिवणी, किनवट, बोधडी. देगलूर तालुक्यात मरखेल, हानेगाव, नरंगल, शाहापूर. नांदेड तालुक्यात तरोडा बु. तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी, नांदेड (ग्रामीण), नाळेश्वर, वाजेगाव. नायगाव तालुक्यातील बरबडा, भोकर तालुक्यात भोकर. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यातील शेवडी बा. कापसी बु. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी या मंडळाचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रकार कमी तापमाण, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते  28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 जुलै, 1 एप्रिल ते 31 मे, 1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे आहे.

आंबा फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात दाभड, मालेगाव. कंधार तालुक्यात बारुळ, फुलवळ, पेठवडज. नांदेड तालुक्यातील लिंबगाव, मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद. हदगाव तालुक्यात निवघा, तळणी विमा संरक्षण प्रकार कमी तापमाण, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 31, 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मे, 1 फेब्रुवारी ते 31 मे याप्रमाणे  विमा संरक्षण कालावधी आहे.

या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारा शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी सहभाग घेऊ शकतात. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारासाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in  वर विमा हप्ता जमा करून सहभागी होता येते. यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सात/बारा, आठ-अ उतारा व पिक लागवड, स्वयंघोषणापत्र, फळबागेचा केलेला फोटो, बँक पासबुक, वरील बँकखात्यामध्ये सविस्तर माहिती द्यावी लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाईन भरता येईल.


या योजनेत शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, अधीक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

Pages