मुंबई : आजच्या घडीला आपण पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. त्यानिमित्त वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आणि चिकित्सा होत आहे. पँथर संपली आहे, अशी चर्चा आणि मतमतांतरे आहेत. परंतु नव्या पिढीला पँथरचा इतिहास समजावा यासाठी 'चैत्यभूमीचा पँथर' हा विशेषांक संपादीत करण्यात येत आहे.
तरी नव्या पिढीतील संशोधक, विचारवंत, कवी यांनी चिकित्सक वैचारिक लेख, कविता पाठवून सहकार्य करावे. लेख, कविता मराठी भाषेत असावेत. लेखाची शब्दमर्यादा ५०० असावी, तसेच मराठी युनिकोड फॉण्ट असावा. काही निवडक लेख आणि कविता 'चैत्यभूमीचा पँथर' या विशेषांकात प्रसिद्ध केल्या जातील. सदरहू साहित्य १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत खालील ई-मेलवर पाठवावे.
डॉ. सुनील अभिमान अवचार
संपादक, चैत्यभूमी : पँथर विशेषांक
मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ,
विद्यानगरी, कालिना, सांताक्रूझ, मुंबई -४०००९८
ई मेल - awacharsunil@yahoo.com
No comments:
Post a Comment