परतीच्या पावसाने किनवट तालुक्यात दाणादाण; नऊही मंडळात अतिवृष्टी; ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजावर अस्मानी संकट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 20 October 2022

परतीच्या पावसाने किनवट तालुक्यात दाणादाण; नऊही मंडळात अतिवृष्टी; ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजावर अस्मानी संकट

किनवट, ता.19 (प्रतिनिधी) :  परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोर करत मंगळवारी (दि.18) किनवट तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. विजा व मेघगर्जनेसह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील नऊही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यंदाची ही तालुक्यातील दहावी अतिवृष्टी होती. बुधवार सकाळपर्यंतच्या गत 24 तासात किनवट तालुक्यात पडलेला एकूण पाऊस 633.80 मि.मी. असून, त्याची सरासरी 70.42 मि.मी. आहे.


      अतिपावसामुळे किनवट तालुक्यातील यंदाच्या  खरीप हंगामात एकूण 78 हजार 144 हेक्टरवर पेरल्या गेलेल्या पिकांची अक्षरश: माती झालेली आहे. अतिवृष्टी व त्यापाठोपाठ पीक पंचनामे असे सुरू झालेले दुष्टचक्र थांबता थांबत नाही. गत सलग तीन वर्षापासून हीच परिस्थिती असल्यामुळे शेकडो शेतकरी देशोधडीला लागले असून  काहींनी आत्महत्या केलेल्या आहेत. 42 हजार 340 हेक्टरवर पेरल्या गेलेला कापूस व 25 हजार 062 हेक्टरवरचे सोयाबीन ही दोन्ही नगदी पिके मातीमोल झाली असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा हिरमुसला आहे. तालुक्यात खरीपाच्या दुसर्‍या महिन्यापासूनच पिकांची हानी सुरू झाली असून,  जुलैमध्ये तब्बल सहावेळा तर सप्टेंबर तीन वेळा आणि आता शेवटी ऑक्टोबरमध्ये एकदा धरून एकूण दहा वेळा अतिवृष्टी झालेली आहे. हा गत पंधरा -वीस वर्षातील उच्चांक आहे. उमेद हरवून हताश झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी  नुकसान भरपाईच्या रकमा वेळेत देणे आणि जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळवून देणे, असे दोनच पर्याय सध्या सरकारी यंत्रणेच्या हातात आहेत.


       बुधवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 67.5 (1419.4 मि.मी.); बोधडी- 74.5(1448.8 मि.मी.); इस्लापूर- 65.8 (1560.9 मि.मी.); जलधरा- 65.8 (1605.1 मि.मी.); शिवणी- 64.5 (1523.0 मि.मी.); मांडवी-69.8 (1353.8 मि.मी.);  दहेली- 84.8(1489.0 मि.मी.), सिंदगी मोहपूर 71.8(1352.0 मि.मी.); उमरी बाजार 69.3 (1319.4 मि.मी.).


     तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून बुधवार(दि.19 ऑक्टोबर) पर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 13,071.4 मि.मी.असून, त्याची सरासरी 1,452.7 मि.मी.येते.  आजघडीला तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात(160.9 टक्के) झालेला असून, सर्वात कमी उमरीबाजार (132.2 टक्के) मंडळात झालेला आहे. सर्वच मंडळात पडलेल्या पावसाने तालुक्याची वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली आहे. तालुक्यात बुधवार दि.19 ऑक्टोबरपर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 997.7 मि.मी.असून, या तुलनेत 145.6 टक्के पाऊस पडलेला आहे. अर्थात 45.6 टक्के पाऊस जास्तीचा पडलेला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यानची अपेक्षित पावसाची सरासरी 951.90 मि.मी. असून, ती अडीच महिन्यातच अर्थात 15 ऑगस्टलाच ओलांडल्या गेली आहे. या तुलनेत आजपर्यंतचा पडलेला पाऊस 152.61 टक्के आहे. मागील वर्षी 19 ऑक्टोबरपर्यंत पडलेला पाऊस 1,351.20 मि.मी. होता. 30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 131.62 होती.

1 comment:

  1. For instance, Evolution enables you to wager on the outcomes of different individuals at the table. You may also keep your preferred bets so that you don't have to waste time placing chips each time. Because of the integration of real and software program capabilities, 온라인카지노 the variety of such capabilities is rising every day. Although much less in style than blackjack and roulette, the reside version of Casino Hold’em can be discovered at casinos powered by Evolution, Playtech and Xpro, among others.

    ReplyDelete

Pages