केरळ राज्य शासनाच्या 21 प्रशिक्षणार्थी अधिका-यांकडून नवी मुंबईच्या प्रकल्प, कामांचे कौतुक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 October 2022

केरळ राज्य शासनाच्या 21 प्रशिक्षणार्थी अधिका-यांकडून नवी मुंबईच्या प्रकल्प, कामांचे कौतुक

 नवी मुंबई :                                             

विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे नवी मुंबई हे देशातील वेगळे शहर म्हणून नावाजले जात आहे. त्या अनुषंगाने विविध राज्यातील तसेच देशांतील पदाधिकारी, अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेस भेटी देत असतात. अशाच प्रकारे केरळ राज्य शासनाच्या प्रशासकिय प्रशिक्षण संस्थेमार्फत 21 प्रशिक्षणार्थी अधिका-यांच्या समुहाने नवी मुंबईस भेट देऊन विविध उल्लेखनीय कामांची माहिती जाणून घेतली. तसेच काही प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटी दिल्या.

महापालिका मुख्यालयात प्रशिक्षणार्थी अधिका-यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांनी महानगरपालिकेच्या वाटचालीविषयी व प्रकल्प, कामांविषयी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.  

कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये यांनी या सर्व अतिथी अधिका-यांना मुख्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणीमध्ये माहिती दिली व सर्वसाधारण सभेच्या राजमाता जिजाऊ सभागृहातील व्यवस्थेचीही माहिती दिली. या अधिकारी समुहाने कोपरखैरणे येथील अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्र तसेच टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटला भेट देऊन बारकाईने जलशुध्दीकरण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर उद्योग समुहांना करण्यात येत आहे या वैशिष्ट्याबद्दल उत्कंठा प्रदर्शित करीत या समुहाने या संपूर्ण प्रक्रियेची बारकाईने माहिती घेतली.

जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याठिकाणी निसर्गौद्यानासारखे भव्य उद्यान साकारणे ही अतिशय वेगळी गोष्ट असून त्यामधील स्वचछता पार्क म्हणजे स्वच्छतेचा संस्कार करणारी बाब असल्याचे मत अधिकारी समुहातील अनेकांनी व्यक्त केले. त्याठिकाणी उभारलेले मियावाकी जंगल हे अद्भूत असून त्या जंगलातूनही फेरफटका करीत नैसर्गिक शांततेचा व थंडाव्याचा अनुभव या अधिका-यांनी घेतला.

नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे ग्रीन बिल्डींग मानांकनाला साजेसे असून त्याची भव्यता, आतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याचे विशेष कौतुक या अधिकारी समुहाने केले. नवी मुंबईबद्दल आम्ही ऐकून होतो त्यापेक्षा हे अधिक आधुनिक व उत्तम शहर असून नवी मुंबईकरांच्या अतिथ्यशीलतेने आम्ही भारावून गेलो असल्याचे मत या अधिकारी समुहाने नोंदविले.

 

No comments:

Post a Comment

Pages