समाजकल्याण वसतिगृहातील समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचा ठिय्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 October 2022

समाजकल्याण वसतिगृहातील समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचा ठिय्या

औरंगाबाद,निलेश वाघमारे :

 1000 मुलांचे समाजकल्याण वसतिगृह , किल्लेअर्क औरंगाबाद येथे वसतिगृहातील विविध प्रकारच्या समस्यासाठी काल मुलांनी आंदोलन केले. या आंदोलनात वस्तीगृहातील समस्याचे पाढेच वाचुन दाखवले. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे घर गाठत विद्यार्थांच्या समस्या सांगितल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील या आश्वासनानंतर विद्यार्थी माघारी परतले. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी घर गाठल्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन विद्यार्थांना शांत केले. शासकीय वसतिगृहातील विविध सेवेअभावी विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे . निर्वाह भत्ता, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक समस्या, पाणी, जेवण, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वसतिगृहात  आहेत या समस्या तात्काळ सोडवण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे . शासकीय वसतिगृहातील या समस्या सोडवण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण आयुक्त,  यांना थेट निवेदन देऊनही या समस्या सुटलेल्या नाहीत.. तरी लवकरात लवकर या समस्या सोडवण्यात येतील असे समाजकल्याण अधिकारी वाबळे यांनी सांगीतले.


No comments:

Post a Comment

Pages