आंबेडकरवादी मिशनचे कार्य हे राष्ट्र निर्माणाचे -अनिलकुमार मोरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 October 2022

आंबेडकरवादी मिशनचे कार्य हे राष्ट्र निर्माणाचे -अनिलकुमार मोरे

नांदेड,जयवर्धन भोसीकर :

आंबेडकरवादी मिशनचे कार्य राष्ट्रनिर्माणाची असून शिक्षणाला त्यांनी केंद्र केले आहे महात्मा फुले यांचे शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न आंबेडकरवादी मिशन मधून पूर्ण होईल.गत काही वर्षात मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. त्यामुळे तरुण 

पिढी बर्बाद होण्याची शक्यता नजीकच्या काळात अधिक आहे, असा इशारा सेवानिवृत्त कॅफो तथा वक्ते एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी दिला आहे.


आंबेडकरवादी मिशनतर्फे दिवाळीच्या सुटीत शेवटच्या दिवशी म्हणजे  कॅम्पसमधील स्पर्धा परीक्षार्थींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्तविक मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. त्यांनी मिशनसमोरील विविध अडचणींवर मात करीत वाटचाल सुरु आहे, आगामी काळात कोरोनामुळे बंद पडलेले उपक्रम पुन्हा सुरु करण्याचा मानस बोलून दाखविला. विचारमंच वर , तेलंगणातील जिल्हाधिकारी कालिचरण खरतडे,कामाजी पवार, एकनाथ मोरे, गोविंद नांदेडे, जिल्'ातील पहिले सनदी अधिकारी आर.केग़ायकवाड, डॉ.यशवंत चव्हाण, उत्तम सोनकांबळे, गंदेवार, उपजिल्हाधिकारी भारत कदम, भास्कर दवणे, कृष्णा उमरीकर, अमित खैरे, डॉ.इंगळे, धम्मानंद नरवाडे,विनोद काळे, विजेंद्र, राम कदम, दिनेश सवंडकर, प्रो.कांबळे, प्राचार्य कमलाकर जोंधळे, शिवा कांबळे, दिगांबर मोरे, सुधीर साळवे,शिवाजी सोनकांबळे, रमेश चित्ते, बी.एम.मादळे, अविनाश नाईक,विशाल सूर्यवंशी,प्रा.हनुमंत भोपाळे, संभाजी कदम, सावित्री माई कदम ,इंजिनिअर शिवाजी सोनकांबळे , प्राध्यापक अविनाश नाईक,शेषराव वाघमारे अलका आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गौतम बुध्द, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकारी खरतडे यांनी आंबेडकरवादी मिशनला सर्वतोपरी सहकार्य करु आणि पुन्हा तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी येऊ असे जाहीर केले. राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी, सेवानिवृत्तीनंतरही आम्ही घरी बसलो नाही तर गावा गावात जाऊन प्रबोधन करीत आहोत. व्यसन आणि आळस हे देशातील तरुणांचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे आमचे मत झाले आहे. देशाला पाकिस्तान किंवा चीनचा मुळीच धोका नाही, तेवढा धोका हा व्यसन व आळसापासून तरुणांना आहे,त्यामुळे आम्ही या दोन्ही गोष्टींपासून तरुणांनी विशेषत: ग्रामीण तरुणांनी दूर रहावे म्हणून धडपडत आहोत, असे सांगितले. परराष्ट्र खात्याच्या सेवेत जर्मनीमध्ये कार्यरत नांदेडचा सुपुत्र सुयश चव्हाण याचे वडिल डॉ.यशवंत चव्हाण यांनीही जर्मनीतील अनुभव कथन केले. आम्ही ज्याचा विचार ही केला नाही ते आमच्या मुलाने करुन दाखविल्याने अभिमान वाटतो, असे सांगून तरुणांनी ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करावी असा सल्ला दिला. सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशाला खरा धोका मोबाईलपासून आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सन २०२५ पासून मोबाईलच्या रेडिएशनपासून होणाऱ्या आजाराच्या रुग्णांची संख्या भयानक वाढण्याचा इशारा दिला आहे. हा अहवाल अतिशय गंभीर स्वरुपाचा असून दिवसरात्र मोबाईल फोन वापरणे, त्याच्या वापराचे व्यसन जडणे हे सर्वात धोकादायक ठरणार आहे.त्यामुळे तरुणांनी आतापासूनच दररोज किमान काही तास तरी मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. महात्मा गौतम बुध्दाची शांती,करुणेची शिकवण, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता यांचा उल्लेख करीत मोरे यांनी तरुण,तरुणींमध्ये जोश आणि होश निर्माण केला.

No comments:

Post a Comment

Pages