मानवतेचे संरक्षण होण्यासाठी भारतालाच काय पण साऱ्या जगाला शेवटी बुध्द धर्माची कास धरावी लागेल.. डॉ बाबासाहेब आंबेडकर (मुंबई २७मे१९५३) (धर्म.. धर्म हा समाजाला आवश्यक नाही असे काही लोक समजतात माझा तसा दृष्टीकोन नाही ,धर्माचा पाया हा व्यक्तीच्या जीवनाला आवश्यक आणि सामाजिक व्यवहाराला पोषक असा आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाणात आणि भाषणात धर्माची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले आहे .त्यांच्या मते धर्म हा सामाजिक वारसा या स्वरूपात असतो. दलित वर्गीय तरुणांच्या एका परिषदेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,की तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहून मला दुःख होते , काही लोक समजतात तशी धर्म ही अफूची गोळी नाही माझ्यात ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही त्याला मन आहे आणि त्याला विचारासाठी खाद्याची आवश्यकता असते "धर्म माणसात आशावाद निर्माण करतो आणि त्याच्या कार्याला प्रवृत्त करतो हाच त्याच्या धर्मविषयक विचारांचा स्थायीभाव आहे " (धर्माची तत्वे.... डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची तत्व सांगताना म्हणतात की १) नीतिमत्ता या अर्थी धर्म हा समाजावर सत्ता चालवणारा असला पाहिजे.२) धर्म हा जर कार्यवाहीत राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.३) धर्माच्या नितीतत्वात मूलभूत तत्वे म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना मान्यता असली पाहिजे सामाजिक जीवनातील मूलभूत अशी वरील तीन तत्वे धर्माने मान्य केली तर तो धर्म राहील नाहीतर तो नाश पावेल. धर्म हा विज्ञानवादी समाजाच्या हिताचा असला पाहिजे जर तो समाजाच्या भौतिक धारणेला पोषक नसेल तो खरा धर्म नसतो.(धर्म आणि धम्म....... धर्म हा बुद्धिनिष्ठ नितीप्रवृत्त आणि अध्यात्मिक असा असावा या कसोटीने पाहिले तर बुद्धाचा धम्म हाच खरा धर्म होय. हिंदुधर्म हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे त्याच्या उलट धम्म सामाजिक स्वरूपाचा आहे . या धम्मामध्ये उपासना, प्रार्थना
,यात्रा यांना थारा नाही. धम्म हा नैतिकवर आधारित आहे. धम्म म्हणजे सदाचरण जिवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसात न्यायपूर्व संबंध प्रस्थापित करणे. मनुष्य एकटा असेल तर त्याला धम्माची जरुरी लागणार नाही ,पण समाज धम्माविना चालु शकत नाही . धम्माने सर्वच वाईट गोष्टी प्रथा परंपरा याचा त्याग केला आहे थोडक्यात म्हणजे बुद्धाचा धम्मच खरा अर्थाने धर्म ठरू शकतो असे दिसते.(धर्मांतर का व कशासाठी!.... डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुंबई इलाखा महार परिषदेत केलेल्या आपल्या. ऐतिहासिक भाषणात म्हणतात की माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा!, संघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा! स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा!, समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा!. अशा प्रकारे धर्मांतर कश्यासाठी आहे आहे हे कळते.जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? असा सवाल बाबासाहेब करतात ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसुन रोग आहे.यावरून धर्मांतर का करावे हे आपल्याला समजेल.(मुक्ती कोण पथे मुंबई ३१मे१९३६) बाबासाहेबांनी माणुसकीच्या हितासाठी मानवतावाद रुजवण्यासाठी धर्मांतर किती गरजेचे आहे हे दाखवून दिले, (बुद्ध धम्माचा स्वीकार हाच पर्यायी मार्ग..... बुध्द धम्मात भेदभाव नाही सर्वत्र समसमानता आढळून येईल . बुध्द धम्मात देव, आत्मा, यांचा विचार केलेला नसून माणसाने माणसाशी कश्या प्रकारे वागले पाहिजे याचा विचार केलेला आढळतो. या धर्मात नीतीचे संबंध सांगितले आहे हा सतधर्म आहे. बौध्द धम्म भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याच तत्वज्ञानाने मानवाच्या कल्याणाचा मार्ग माणसाला सापडणे शक्य आहे . यावरून धम्माचा स्वीकार करणे हाच पर्यायी मार्ग आहे... विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा..!
- निलेश वाघमारे.8180869782 नांदेड
No comments:
Post a Comment