ॲड. राजस खोब्रागडे मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 November 2022

ॲड. राजस खोब्रागडे मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर

 


मंगळवेढा -  महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षा चे संस्थापक दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचे नातू ऍड राजस खोबरागडे  उद्या शनिवार दिनांक 26.11.2022 रोजी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती पक्षा चे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान भोसले यांनी दिली.संविधान दिनानिमित्त पक्षा तर्फे सोलापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे  आयोजन केले असून सकाळी आठ वाजता ते डोंगरगाव येथे होणाऱ्या संविधान कार्यक्रमास उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. तर सकाळी 11वाजता कोण्हेरी ता. मोहोळ येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान कांबळे यांनी आयोजित केलेल्या संविधान कार्यक्रमास उपस्तिथी, दुपारी 1ते 2 या वेळेत मोहोळ येथे कार्यकर्त्याशी सवांद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता सुस्ते ता. पंढरपूर येथे पक्षाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण (तात्या )वाघमारे तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तर सायंकाळी 6 वाजता पक्षा चे जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले यांनी नंदुर ता. मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या संविधान कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन व रात्री पंढरपूर येथे मुक्काम करणार असून रविवार दिनांक 27.11.2022 रोजी सकाळी 8 वाजता ते सांगली कडे प्रयाण करणार आहेत.या दौऱ्यात त्यांच्या सोबत पक्षाचे प्रदेश सचिव डी. के साखरे, अर्धवेळ स्त्री परिचर महासंघाच्या राज्याध्यक्ष वनिता वजाळे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा पद्मिनी शेवडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष समाधान कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले, पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण (तात्या )वाघमारे, तालुका महिला अध्यक्ष बाळाताई डावरे,भटक्या सेलचे जिल्हाप्रमुख भाई रवींद्र काळे, तालुका अध्यक्ष सोमन्ना सपंगे, माळशिरस तालुका अध्यक्ष रामदास धाईंजे, नाजुका लोखंडे, गवळण लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कसबे, राहुल लोखंडे आदींची उपस्थिती राहणार असून पक्षा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाच्या जिल्हा शाखे तर्फे करण्यात आले असल्याची माहितीही भोसले यांनी दिली

No comments:

Post a Comment

Pages