नागसेनवनातून निघणार संविधान गौरव रॅली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 November 2022

नागसेनवनातून निघणार संविधान गौरव रॅली

औरंगाबाद : संविधान गौरव दिनानिमित्त नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी,मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नागसेनवनातून संविधान गौरव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सचिन निकम यांनी दिली आहे.

सदरची रॅली ही नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात निघून मिलकॉर्नर येथे छ. शाहू महाराजांना अभिवादन करून खडकेश्वर मार्गे औरंगपुरा येथील क्रांतीबा फुले-सावित्रीमाई फुले ह्याना अभिवादन करून भाजी मंडई मार्गे जुना बाजार येथून भडकलगेट येथे विसर्जित करण्यात येईल यावेळी भडकल गेट लगतच्या संविधान प्रस्ताविकेवर पुष्प उधळण्यात येतील तर शेकडो फुगे सोडून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल.

ह्यावेळी के.एम बनकर सहकाऱ्यांच्या वतीने लाठीकाठी चे प्रात्यक्षिक तर सेक्सोफोन वरील भीमगीतांचे सादरीकरण करण्यात येईल.या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन होईल रॅली मध्ये संविधानाच्या मूल्यांचा गौरव करणारे शेकडो फलक,भव्य संदेश फलक यांच्या सह शालेय विद्यार्थी व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषा करून सहभागी होतील.

या रॅलीत विविध आंबेडकरी कार्यकर्ते व संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सचिन निकम,अविनाश कांबळे, गुणरत्न सोनवणे,कुणाल भालेराव,चिरंजीव मनवर,प्रा.प्रबोधन बनसोडे आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages