हिमायतनगर येथे रस्ता सुरक्षा नियमावली बाबत पथनाट्यातून मार्गदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 November 2022

हिमायतनगर येथे रस्ता सुरक्षा नियमावली बाबत पथनाट्यातून मार्गदर्शन

हिमायतनगर (प्रतिनीधी ) : प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड,रस्ता व फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर बसस्थानक येथे नागरिकांसाठी  पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षा पथनाट्य व रस्ता सुरक्षा नियमावलीचे मार्गदर्शन करण्यात आले असुन,यावेळी बस्थानक हिमायत नगर येथे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला , तर पथनाट्यातून रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहन चालविताना दुचाकीवर हेल्मेट व चार चाकीत सीट बेल्टचा वापर करा,वाहन चालवतांना मोबाईलवर बोलू नका,मद्यप्राशन करून वाहने चालवू नका,चुकीची पद्धत वापरुन रस्ता ओलांडू नका,व ओव्हरटेक करू नका,रस्त्यावरील चित्र संंदेशाचे पालन करा,वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवा,असे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेची जनजागृती करण्यात आली,हिमायत नगर बसस्थानक येथे रस्ता सुरक्षा पथनाट्य सादर करून पुढे भोकर,उमरी,धर्माबाद,बिलोली आदी तालुक्यात जनजागृतीसाठी कलापथक मार्गस्थ झाले आहे,यावेळी रस्ता सुरक्षा अभियान कलापथक प्रमुख माधव वाघमारे,मुख्य गायीका सविताताई गोदाम,तबलावादक अधिराज वाघमारे,हार्मोनियमवादक सुरज गायकवाड,सहकलाकार दत्ता पोटलेवाड,पांडूरंग हापसेवाड,प्रविण मल्लेवार,सिमा जाधव,प्रविण रोकडे  आदी सहकलाकार सहभागी होते.तसेच जिल्हाभर रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव साईप्रसाद जळपतराव,सदस्य सचिन वाघमारे,बाळासाहेब टिकेकर आदी पदाधिकारी परिश्रम घेवून नियोजन करत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages