जातीयतेच्या बेड्या तोडू संविधानाने भारत जोडू संविधान गौरव रॅलीचा संदेश ; 'वुई आर इंडियन्स फस्टली अँड लास्टली' च्या भव्य फलकाने वेधले लक्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 27 November 2022

जातीयतेच्या बेड्या तोडू संविधानाने भारत जोडू संविधान गौरव रॅलीचा संदेश ; 'वुई आर इंडियन्स फस्टली अँड लास्टली' च्या भव्य फलकाने वेधले लक्ष

औरंगाबाद : भारतीय संविधान दिनानिमित्त नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी,मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने लुम्बिनी उद्यान नागसेनवन येथुन काढण्यात आलेली संविधान गौरव रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.


सदरची रॅली ही नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात निघून मिलकॉर्नर येथे छ. शाहू महाराजांना अभिवादन करून खडकेश्वर मार्गे औरंगपुरा येथील क्रांतीबा फुले-सावित्रीमाई फुले ह्याना अभिवादन करून भाजी मंडई मार्गे जुना बाजार येथून भडकलगेट येथे विसर्जित करण्यात आली यावेळी भडकल गेट लगतच्या संविधान प्रस्ताविकेवर पुष्प उधळण्यात आले तर शेकडो निळे फुगे सोडून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले.

ह्यावेळी मिलिंदचे माजी विद्यार्थी जेष्ठ नागरिक नागेश माटे, रमेश गायकवाड,मच्छिंद्र सोनवणे, व उज्वल बनकर,के.एम बनकर व सहकाऱ्यांनी सेक्सोफोन वर उद्धरली कोटी कुळे भिमातुझ्या जन्मामुळे,तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे आदि भीमगिते सादर करून सुरमयी अभिवादन केले.

तर सागर दांडगे,संकेत मोकळे,अजय मोकळे,सुजाता गलाटे, प्रतीक्षा खरात,अविनाश बनकर,प्रसेनजीत बनकर,सुमेध बनकर यांनी लाठीकाठी व युद्धकलेचे  प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

 रॅली मध्ये संविधानाच्या मूल्यांचा गौरव करणारे शेकडो फलक,भव्य संदेश फलक यांच्या सह शालेय विद्यार्थी व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते.

ह्यावेळी श्रावण गायकवाड, डॉ.प्रमोद दुथडे,प्रल्हाद अंभोरे,प्रशांत संघवी,कृष्णा बनकर,सुशीला खडसे, चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड, सचिन खाजेकर,मनिषाताई साळुंखे,छायाताई मेश्राम,मिलिंद बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तर आयोजक सचिन निकम, अविनाश कांबळे,विशाल सरपे, गुणरत्न सोनवणे,कुणाल भालेराव,सिद्धार्थ शिंगारे,चिरंजीव मनवर,राहुल वडमारे, प्रवीण हिवराळे,सम्यक सर्पे,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,बाळू वाघमारे ,नवल सूर्यवंशी,संदिप अहिरे,मनीष नरवडे,किरण गायकवाड, महेंद्र तांबे,महेंद्र बनसोडे,सिद्धार्थ सदाशिवे,प्रसेनजीत गायकवाड,सुमित नावकर,पवन पवार,अक्षय शेजुळ,डॉ.अविनाश सोनवणे,कुणाल राऊत,अमित दांडगे,शैलेश बागुल ,विक्रम जगताप,प्रमोद निकाळजे,विश्वजित गायकवाड,सचिन गायकवाड, विकास हिवराळे,धम्मपाल भुजबळ,अविनाश डोंगरे,स्वप्नील गायकवाड,निलेश वाघमारे,प्रशांत बोराडे, संदिप तुपसमुदरे, भागवत चोपडे,नारायण खरात,भीमराव वाघमारे,सिद्धार्थ मोरे,विकास रोडे,अमोल खरात,जयेश पठाडे,योगेश घुसळे,पिंटू भिंगारे,राजेश नावकर आदींनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

Pages