संविधान दिनापूर्वी भडकलगेट वाहतूक बेटावरील संविधान प्रस्ताविकेची स्वच्छता व रंगरंगोटी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 23 November 2022

संविधान दिनापूर्वी भडकलगेट वाहतूक बेटावरील संविधान प्रस्ताविकेची स्वच्छता व रंगरंगोटी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

औरंगाबाद :

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने भडकलगेट लगतच्या वाहतूक बेटावर असणाऱ्या संविधान प्रस्ताविकेची देखभाल दुरुस्तीअभावी प्रचंड दुर्दशा झालेली असल्याने 26 नोव्हेंबर पूर्वी त्याची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

भडकलगेट येथे संविधान प्रस्ताविकेच्या परिसरात रिकामटेकड्या चा अड्डा निर्माण झाला असल्याचे मनपा आयुक्त अभिजित चौधरी ह्यांना सोपवलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

 ह्या पूर्वी देखील रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या मागणीवरून संविधान प्रस्ताविकेची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु प्रशासनाच्या 

दुर्लक्षामुळे सदरील वास्तूचे पावित्र्य राखले जात नसल्याने सदरील ठिकाणचीअस्ताव्यस्त वाढलेले झाडे छाटून रंगरंगोटी,विद्युत रोषणाई,स्वच्छता राहील व नागरिकांचे लक्ष संविधान प्रस्ताविकेकडे वेधले जाईल याची तात्काळ व्यवस्था करावी.


भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला भारतीय नागरिकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असताना त्याचा असा अवमान होणे अत्यंत खेदजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून संविधान प्रस्ताविकेचे व वाहुतक बेटाचे पूर्णपणे सुशोभीकरण करण्यात यावे ह्या परिसरात अस्वच्छता पासरविणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी निवेदनात केली आहे.



No comments:

Post a Comment

Pages