नांदेड : येथील नितीन महादेव मंडाले यांनी दिवाळी सण गावाकडे साजरा करण्यासाठी प्रवासाचे पूर्व नियोजन करून कोल्हापूर ते लातूर जाणाऱ्या बसचे सांगली ते लातूर प्रयत्न तीन सीट आरक्षीत केले. सदरील बस रद्द झाली त्यांची पूर्व सूचना न दिल्यामुळे मा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आगार व्यवस्थापकाला एकूण तीन हजार रुपये दंड लावला.
तुळशी गावाचे सरपंच नितीन मंडाले यांनी दिनांक 28/10/2021 च्या कोल्हापूर ते लातूर जाणाऱ्या बसचे सांगली ते लातूर पर्यंत तीन सीट आरक्षीत केले. त्याबद्दल त्यांनी महामंडळला सेवेचा मोबदला म्हणून एकूण 2034 रुपये दिले. दिनांक 28/10/2021 रोजी मंडाले व त्याच्या कुटूंबातील सदस्य सांगली येथील बसस्थानक येथे येऊन कोल्हापूर ते लातूर जाणाऱ्या बसची वाट बघत बसले बराच वेळ बसस्थानकात ताटकळत बसल्यानंतर बसची निश्चित वेळ होऊन सुद्धा बस येत नाही म्हणून मंडाले यांनी चौकशी विभागाकडे चौकशी केली तेव्हा त्यांना समजले कि कोल्हापूर ते लातूर जाणारी बस रद्द झाली आहे.
नितीन मंडाले यांनी तिकीट आरक्षित करत असताना स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता परंतु आगार व्यवस्थापकानी त्यांना बस रद्द झाली अशी कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही त्यामुळे मंडाले व त्यांचा कुटूंबातील सदस्यांना मानसिक व शाररिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी ऍड. सचिन भीमराव दारवंडे यांच्या मार्फत ग्राहक तक्रार दाखल केली.
मानसिक त्रासापोटी मंडाले यांनी 50,000/- रुपयाची मागणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे केली होती.ग्राहक आयोगच्या मा.अध्यक्ष श्रीमती अनुराधा सातपुते, सदस्य रविंद्र बिलोलीकर आणि श्रीमती कविता देशमुख यांनी मंडाले आणि आगार व्यवस्थापक अधिकारी दोघांची बाजू ऐकून घेतली. ग्राहक आयोगाने त्यानंतर मंडाले यांची तक्रार अंशतः मंजुर केली. तिकिटाची एकूण रक्कम 3000 रुपये मंडाले यांना परत देण्याचा तसेच आगार व्यवस्थापक यांना मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून 2 हजाराचा दंड ठोठावला व ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी लागलेला एकूण खर्च 1000/- रुपये मंडाले यांना देण्याचा आदेश झाला. सदरील प्रकरणात मंडाले यांची बाजु ऍड सचिन भीमराव दारवंडे यांनी व आगार व्यवस्थापकांची बाजू संदीप पवार यांनी मांडली.
No comments:
Post a Comment