मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा ; रात्री उशिरा निघाले महत्वाचे आदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 23 November 2022

मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा ; रात्री उशिरा निघाले महत्वाचे आदेश

औरंगाबाद:

अडीच-तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होण्याची पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रारूप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा हे आदेश प्राप्त झाले आहेत.


मंगळवारी रात्री उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे आदेश काढून लगतच्या जनगणनेच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या, रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार हे निश्चित झाले आहे.


No comments:

Post a Comment

Pages