इस्लापुरात आढळला डेंग्यू आजाराचा रुग्ण ; आरोग्य विभाग व ग्रामपंचायत अनभिज्ञच - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 November 2022

इस्लापुरात आढळला डेंग्यू आजाराचा रुग्ण ; आरोग्य विभाग व ग्रामपंचायत अनभिज्ञच

किनवट,दि.९(प्रतिनिधी): इस्लापूर(ता.किनवट) येथे नुकताच डेंग्यू तापाचा रूग्ण आढळला आहे.त्या डेंगू आजाराच्या रुग्णावर नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.दरम्यान, इस्लापूर येथे डेंगू सारख्या आजाराचे रूग्ण सापडत आहेत.परंतू, ग्रामपंचायत कार्यालय व तसेच आरोग्य विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे,असा आरोप तेथील जागृत नागरिकांनी केला आहे.  

  इस्लापूर येथील  स्वप्नील काशिनाथ शिंदे (वय २२) या युवकांस ताप येत असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नांदेड येथे अधिक उपचार करण्यासाठी एका खाजगी दवाखान्यात त्याला दाखल केरण्यात आले.तपासणी अंती तो रूग्ण डेंगू तापाचा आजार असल्याचे तेथील डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे.  इस्लापूर परिसरात सर्वत्र घानीचे साम्राज्य पसरले आहे.  ग्रामपंचायत प्रशासन गावातील सुविधे बाबत जागरूक राहत नसल्याने गावात प्रचंड घानीचे साम्राज्य पसरले आहे.  गावातील नाल्या उपसा वेळेवर होत नसल्याने घान पाणी एके ठिकाणी अनेक दिवस साचून राहत असल्याने डासांच्या उत्पतीत प्रचंड वाढ झाली असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इस्लापूर येथे आणखीण काही रूग्ण डेंगू आजाराने बाधीत निघू शकतात. या बाबींकडे ग्रामपंचायत प्रशासन व तसेच आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष वेधून  युद्ध पातळीवर तपासणी मोहीम हाती घेवून   उपचार तातडीने करण्यात यावे.अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

   याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.वाय.मुरमुरे यांच्याशि संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांचा मोबाईल बंद दाखवत होता.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात भेट देऊन माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता डॉ.मुरमुरे यांचा अन्य एका ठिकाणचा प्रसार असल्याचे सांगण्यात आले.एखादे वेळीच ते कार्यालयात येतात ,अशीही माहिती त्यांच्याविषयी मिळाली.

   इस्लापूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे डेंग्यू आजाराचा कोणताही रुग्ण आलेला नाही, तरीदेखील आम्ही गावात तपासणी सुरू करणार आहोत व यासंदर्भाने योग्य ती काळजी घेणार आहोत.

No comments:

Post a Comment

Pages