कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारक कृती आराखडा सादर करा, समाज कल्याण आयुक्त डॉ.नारनवरे यांचे प्रशासनाला निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 November 2022

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारक कृती आराखडा सादर करा, समाज कल्याण आयुक्त डॉ.नारनवरे यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी ज्या जागेवर वाद नाही अशा जागेचा विकासाचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दिनांक १ जानेवारी शौर्य दिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्याचा निर्णय शासनाने गेल्या वर्षी घेतला आहे.  

त्या अनुषंगाने, तसेच भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्या संदर्भात दि ७ रोजी राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, यांनी बैठक आयोजित केली असता त्याप्रसंगी ते मार्गदर्शन बोलत होते.

विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय भवन येथे संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणांचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी आयुक्त यांनी सर्व यंत्रणांच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत विजयस्तंभ परिसरास भेट देऊन त्याबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. 


विजयस्तंभ परिसरात ज्या जागेचा न्यायालयात विषय प्रलंबित आहे, सदर जागा सोडून इतर जागा जी स्मारकाच्या व शासनाच्या ताब्यात आहे त्या संदर्भात विकास कामे करण्यासाठी ,  तसेच राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी तात्काळ कृती आराखडा सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.यावेळी त्यांच्यासोबत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजबभिये, उपायुक्त रवींद्र कदम पाटील,प्रादेशिक उपायुक्त,बाळासाहेब सोळंकी, जिल्हा परिषद चे मिलिंद टोणपे, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे संगीता डावखर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, लोणीकंद गजानन पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जान्हवी रोडे, यांच्या बरोबर सर्व शासकीय यंत्रणांचे कार्यालय प्रमुख,भिमा कोरेगाव स्मारक सेवा संघ, रिपब्लिकन विद्यार्थी सेवा, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, रिपब्लिकन कामगार सेना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), मुक्ती मोर्चा, यांच्यासह विविध संस्थांचे पदधिकारी उपस्थित होते.

गेली दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध होते, सध्या सर्व निर्बंध  हटविण्यात आले आहे, त्यामुळे यावर्षी दिनाक 1 जानेवारी रोजी देशभरातून लाखोच्या संख्येने अनुयायी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतील, त्यांना आवश्यक सोयी, सुविधा तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, त्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही आश्वासन यावेळी आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी शेवटी बोलताना दिले. सदर बैठकी प्रसंगी उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन त्या अनुषंगाने विविध सूचना तसेच करावयाच्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला.

No comments:

Post a Comment

Pages