नवी दिल्ली, दिनांक 3 : सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली असून दिल्लीकर खवय्ये वडापाव, मिसळपाव, आग्री मटन तसेच चिकन आणि पुरण पोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.
बाबा खडक सिंग मार्गस्थित एम्पोरियम भवन परिसरात सरस फूड फेस्टीवल 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये 17 राज्यांचे 21 खाद्य पदार्थांची दालने (स्टॉल्स) आहेत. बचत गटांच्यावतीने तयार करण्यात येणा-या पकवानांना येथे मांडण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राची दोन दालने आहेत. एक नंदूरबार आणि दूसरे ठाण्यातील आहे
राजधानीत सध्या थंडीची चाहुल लागली आहे. या खुशनुमा वातावरणामध्ये या परिसरात सर्वत्र राज्या-राज्यातील देसी खाद्य पदार्थांचा खमंग सुहास दर्वळतो आहे. हिमाचल प्रदेश ते केरलपर्यंतचे खवय्यांना आवडणारे शाकाहरीसह मांसाहरी पदार्थ ताजे आणि गरमा-गरम वाढले जात आहेत.
यात महाराष्ट्राचा वडापाव, दाबेली, मिसळपाव तोंडाला पाणी सोडतात तर पुरण पोळीने जिभेवर एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे येथे दिसून आले. हे अधिक खाल्ले जाणारे पदार्थ ‘दशमा’ महिला बचत गट, नंदूरबार येथील आहे. तर कोल्हापूरh मटण नुसत ऐकूण असणारे खवय्ये डोळयात पाणी आणूनही खाण्यात दंग दिसले. यासह आग्री मटन, आग्री चिकन, कोळंबी रस्सा, भात, पोळी, तादळांची भाकरी या दिल्लीकरांसाठी नवीन असणारे पदार्थांही खवय्ये चाखूण पाहत आहेत. हे दालन श्री कृपा बचत गट, ठाणे यांचे आहे.
प्रथमच देशाच्या राजधानीत स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने सुरूवातीला असणारी धाकधूक खवय्यांनी ‘और एक’ अशी फरमाईश करत दूर करून आत्मविश्वास वाढला. घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ इतर राज्यातील लोकांपुढे मांडतांना शेफ म्हणून टॅग लागतो तेव्हा मन सुखवून जाते अशी प्रतिक्रिया या बचत गटातील महिलांनी दिली.
आंध्रप्रदेशची दम बिर्याणी, राजस्थानचा दालबाटी चुरमा, उत्तराखंडाचा मालपूआ, पंजाबची सरसों दा साग आणि मक्के दी रोटी, पंजाबचा परोठा सर्वच रूचकर असे आहे. सुंदर अशी सजावट या ठिकाणी दिसत असून खवय्यांनी खाद्यपदार्थांचा निवांत आस्वाद घ्यावा, यासाठी टोकन व्यवस्था केलेली आहे. पिण्याच्यापाणी तसेच हात धुण्यासाठी आणि बसून खाण्याची विशेष व्यवस्था आहे. स्टॉल्स आकर्षक आणि स्वच्छ आहेत. खवय्यांचे मनोरजंन व्हावे म्हणून पियानोवादक सांगतीथ साथ देतो आहे. तसेच या ठिकाणी रोज एक सांस्कृतिक कार्यक्रम ही दाखविण्यात येतो. हे फूड फेस्टीवल 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून ते 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विनाशुल्क सर्वांसाठी खुले आहे.
No comments:
Post a Comment