जयवर्धन भोसीकर (विशेष प्रतिनिधी)
नांदेड :
खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात पदार्पण करणाऱ्या भारत जोडो यात्रा च्या जिल्हा समन्वयक पदी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने मंगेश कदम यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य अनुसचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केली आहे.
खा .राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्र राज्यात 7 नोव्हेंबरला पदार्पण करणार आहे.
या यात्रे निमित्ताने काँग्रेसच्या अनुसूचित विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल्हा समन्वयक व
यात्री समन्वयक अशी नियुक्ती केली आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी. पी.सावंत, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा समन्वयक पदी माजी पंचायत समिती सदस्य तथा नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम यांची नियुक्ती अनुसचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केली आहे.
त्यांच्या या निवडीचे स्वागत राज्य उपाध्यक्ष राजकुमार एंगडे, प्रदेश सरचिटणीस प्रफुल सावंत , जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, माजी जि.प सदस्य निवृत्ती कांबळे, शत्रुघन वाघमारे, डॉ. गंगाधर सोनकाबळे, नांदेड शहराध्यक्ष अनिल कांबळे, अँड.धम्मपाल कदम, महेंद्र गायकवाड , शाहीर आनंद कीर्तने, विकी गायकवाड यांच्यासह अनेकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment