नांदेड : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड येथे शनिवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या धम्म मेळाव्यास भीमराव यशवंतराव आंबेडकर हेही मार्गदर्शन करणार असून जिल्ह्यातील लाखो बौद्ध बांधवांनी या धम्म मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील युवा नेते प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.
राज्यात आणि देशात सध्या सामाजिक, धार्मिक ,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण केली जात आहे. धर्माधिष्ठ राजकारण आणि समाजकारणामुळे मानवी मने कलुशित झाले असून माणसे एकमेकांना विषमतेच्या नजरेतून पाहू लागले आहेत . यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या जडणघडणीला बाधा पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीत गर्व ,अहंकार, लोभ, लालसा या बाबींना मूठमाती देऊन सामाजिक समतेची कास धरत सामाजिक सुधारण्याच्या अनुषंगाने धम्म चळवळीशिवाय अन्य पर्याय नाही या दृष्टिकोनातून आणि धम्म चळवळ अधिक गतिमान करण्याच्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर नगरी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नांदेड येथे भव्य धम्म मेळावा आयोजित केला आहे. या धम्म मेळाव्यात श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव यशवंतराव आंबेडकर हे मार्गदर्शन करणारा असून अनेक मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायांनी या धम्म मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment