रुग्णांना उपचाराच्या दर्जेदार सुविधा द्या - तुकाराम मुंढे ;कर्करोग व नेत्र रुग्णालय परिसराची केली पाहणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 November 2022

रुग्णांना उपचाराच्या दर्जेदार सुविधा द्या - तुकाराम मुंढे ;कर्करोग व नेत्र रुग्णालय परिसराची केली पाहणी

औरंगाबाद, दि. 4  :  रुग्णांना विविध आजारावरील उपचाराच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिल्या. या शहरात विविध प्रकराच्या कर्करोगावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रूग्ण येत आसतात, त्या रुग्णांना आरोग्यच्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून द्यावे असे सांगितले. भेटीदरम्यान कर्करोग रुग्णालय परिसरातील वसतिगृह, आणि नेत्र रुग्णालयाच्या विविध कक्षास भेट देऊन रुग्णांस मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंढे यांनी विचारपूस केली.  

 जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, आरोग्य उपसंचालक डॉ.सुनिता गोल्हाइत, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरंविद गायकवाड, तसेच नेत्र रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

 भेटी नंतर घाटी रुग्णालयाच्या अतिक्रमण झालेल्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणेला याबाबतचे सविस्तर आढावा  सादर करण्याचे आदेशित केले. या दरम्यान तुकाराम मुंढे यांनी शस्त्रक्रिया विभाग, कर्करोगाच्या उपचारासाठी  वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीची पाहणी करुन परिसर  स्वच्छतेच्या बाबतीत दिरगांई करु नये असे निर्देश रुग्णालय प्रशासनास मुंढे यांनी दिले. नेत्र रुग्णालय अंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर मिळणाऱ्या सुविधा, जेवण, नाश्ता व  स्वच्छतेच्या सुविधा प्राधान्याने द्याव्यात.  

 जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आरोग्याच्या सुविधा रुग्णांना वेळेत मिळाव्यात यात प्रामुख्याने महिलांना उपचारादरम्यानच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची सुचना केली. श्री.मुंढे यांनी  नेत्र रुग्णालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील हॉल मधील दुरस्ती करुन ओपीडी सुरु करण्याबाबत सांगितले. सदरील दुरस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करुन घ्यावी. कर्करोग रुग्णालयास तसेच नेत्र रुग्णालयासाठी अधिकची जागा अद्यायावत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  जागेची पाहणी करण्यात आली.


No comments:

Post a Comment

Pages