किनवट ,लक्ष्मीकांत मुंडे : किनवट तालुक्यातील माणिक विद्यालय चिखली (बु) येथे संस्थाचालक यांचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्या कारणाने महिन्यातून दोनच वेळा शाळेवर येऊन हजेरीपटावर उपस्थित असल्याचे स्वाक्षरी करून शासनाचे पगार उचलत असल्याचा प्रकार काही दिवसापुर्वीच उघडकीस आला होता त्याचीच प्रचिती दि 14 नोवव्हेंबर रोजी दै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी लक्ष्मीकांत मुंडे यांना आली.
किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर चिखली (बु) येथे माणिक विद्यालय अंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शाळा कार्यरत असून सदर शाळेवर मुख्याध्यापकासह 14 कर्मचारी कार्यरत आहेत दिनांक 29/06/2022 रोजी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून काही पत्रकारांनी प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता संस्था चालकाचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत परंतु सदर शिक्षक अनेक महिन्यापासून आजारी असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले सदर शिक्षक महिन्यातून दोन वेळा पंधरा दिवसाला एकदा शाळेवर येऊन स्वाक्षरी करतात व फक्त नावाला रजेचा अर्ज शाळेवर ठेवतात यांच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे त्याचा परिणाम शाळेवर होत असून सर्व वर्गाची विद्यार्थी पटसंख्या फक्त 220 असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्याकडून कळाले. संबंधित शिक्षकास त्यावेळी मोबाईल वरून संपर्क केला असता माधव बसवदे सर असे म्हणाले होते की मी बरेच दिवसापासून विविध आजाराने ग्रस्त असल्याकारणाने मी नियमित शाळेवर हजर राहू शकत नाही. शाळेवरील मुख्याध्यापक श्री तीगोटे यांच्याशी पत्रकारांनी मोबाईल वरून संपर्क केला असता त्यांनी सदर बाबतीत मौन बाळगळ्याने एक प्रकारे सदर बाब सत्य असल्याचेच उघडकीस होते.दि.14 नोव्हेंबर रोजी देै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी हे अचानक शाळेवर गेले असता संबंधीत शिक्षक व ईतर एक दोन जण शाळेत हजर नसल्याचे दिसुन आले त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मी दुपारीच नंदीग्रामने निघालोय आणि मी आज शाळेवर आलो होतो असे सांगीतले उद्या येणार का विचारल्यावर माझी रजा आहे अस बोलले लगेच शाळेच्या मुख्याध्यापकास याबाबतीत रजा आहे का किंवा,ते कसे परत गेले विचारले असता नेहमीप्रमाणेच माैन बाळगुन राहीले रजा दाखवाच म्हटल्यावर चला चहाघेऊ अस म्हणत काढता पाय घेतला.या बाबतीत शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तक्रारी अर्ज देणार असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी बोलून दाखविले.
No comments:
Post a Comment