पंडित जवाहरलाल नेहरू व आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे देशासाठी खूप मोठं योगदान - गोविंदराव शिंदे नागेलिकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 November 2022

पंडित जवाहरलाल नेहरू व आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे देशासाठी खूप मोठं योगदान - गोविंदराव शिंदे नागेलिकर

नवीन नांदेड. जयवर्धन भोसीकर :

सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, एक प्रखर राष्ट्रवादी,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची संयुक्त जयंती सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी सम्पर्क कार्यालय येथे आज दिनांक १४.११.२०२२ रोजी साजरी करण्यात आली.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  गोविंदराव शिंदे पाटील नागेलिकर हे होते तर व्यासपीठावर सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, नांदेड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, जेष्ठ काँग्रेस नेते आहात खान पठाण भि.ना.गायकवाड, शेख लतिफ, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू व आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर अध्यक्षीय समारोप करताना गोविंदराव शिंदे पाटील नागेलिकर म्हणाले की ,आधुनिक भारताच्या जडणघडणीत पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी खूप मोठा मोलाचा वाटा उचलला आहे व तसेच ज्यांनी आपले सम्पूर्ण आयुष्य देश सेवेसाठी अर्पण केले. इंग्रजा विरुद्ध लढण्यासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल युवकांच्या मनात पेटवत अनेक क्रांतिकारक घडवले अशा या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाचे योगदान देशासाठी प्रेरणा देणारे राहिल असे मनोगत व्यक्त केले.

या वेळी प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, किशनराव रावणगावकर, वैजनाथ माने, शेख नुर मामु, शंकरराव धिरडीकर, संजय कदम, प्रा. अशोक गोणारकर, प्रा. गजानन मोरे, संतोष कांचनगिरे, अक्षय मुपडे पंढरीनाथ मोटर्गे,काशीनाथ गरड, भुजंग स्वामी, पठाण साब, अशोक शिवभक्ते, संगम 

कांचनगिरे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमात लहान मुलांना खाऊ वाटप करून बाल दीन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शशीकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव पदमने यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages