किनवट :
सन २०२२-२३ हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामचे दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.या बाबींचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये सुयोग्य वाचन, बोलण्याचा सराव, चांगला शब्द संग्रह, उत्तम संभाषण कौशल्य, कलेची आवड व आत्मविश्वास सक्षम करण्यासाठी सदरिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा.महेंद्र घुले,प्रा.कैलास पतंगे,प्रा.सुभाष गडलिंग, प्रा.संदेश तम्मेवार, राधेश्याम जाधव व अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.एच.एल.सोनकांबळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा मुक्ती संग्रामचे नायक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस दीप-धूप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते.वृक्तव स्पर्धेमध्ये ०१) मराठवाडा मुक्तीसंग्रामचा गौरवशाली इतिहास. ०२) गोविंदभाई श्रॉफ यांचे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदान. या दिलेल्या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मंचावर उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या ऐतिहासिक घटनांची अभ्यासपूर्ण व विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
सदरिल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.संदेश तम्मेवार,प्रा.राधेश्माम जाधव, प्रा.सुबोध सर्पे यांनी परिश्रम घेतले.व प्रा.क्रांतिकुमार मोरे,प्रा.विद्या पाटील, प्रा.गुप्ते मॅडम, प्रा.गिमेकर मॅडम, प्रा.कांनिदे मॅडम,महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापक, सेवक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रा.सुबोध सर्पे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment