ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी मोफत एस.टी पास ची सुविधा मिळावी- कुणाल झाल्टे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 November 2022

ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी मोफत एस.टी पास ची सुविधा मिळावी- कुणाल झाल्टे

कोपरगाव प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील विध्यार्थाचा उच्च शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थांसाठी मोफत एस.टी पास ची सुविधा शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रिपब्लिकन विध्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा प्रभारी कुणाल झाल्टे यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेल च्या माध्यमातून केली.


निवेदनात  म्हटले आहे की,

ग्रामीण दुर्गम भागातील विध्यार्थी दररोज शिक्षण घेण्यासाठी शाळा महाविद्यालयात ३० ते ४० किलोमीटर चा प्रवास करून शहरात येत असतात. हा प्रवास करण्यासाठी विद्यार्थाना  एस.टी महामंडळाकडुन महिन्याचे पास दिले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थाना रोज ३०ते ४०किलोमीटर चा प्रवास करण्यासाठी महिन्याला ३०० ते ४०० किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचा महिन्याचा पास काढावा लागतो. जर एका कुटूंबातील २किंवा ३ विध्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्या विद्यार्थांच्या पालकांना महिन्याला १००० ते १२०० रु खर्च येतो. हा खर्च मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करण्याऱ्या ग्रामीण भागातील पालकांना न परवडणारा आहे. त्यामुळे बहुदा पालक अशा वाढीव होणार्या खर्चामुळे, पैशा आभावी विद्यार्थाना एस.टी चा पास काढण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थांच्या शिक्षणावर होतो.

          ज्या प्रमाणे १९९६ पासून सुरू असलेली अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना. ही योजना ५वी ते १२वी पर्यतच्या शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे.  मुलां-मुली मध्ये भेदभाव न करता अशाच प्रकारची योजना मुलासाठी ही लागू करावी. मुलांनाही ह्या सुविधेचा लाभ मिळावा.

        त्याच बरोबर ही योजना फक्त १२वी पर्यतच्या विध्यार्थीनी साठी न राबवता यात वाढ करून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांमध्ये उच्च महाविद्यालयीन शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलां-मुलींसाठी या सुविधेचा लाभ करून देण्यात यावा. जेणे करून पैशा अभावी ग्रामीण भागातील मुलींचे १२वी नंतर होणारी लग्न थांबतील व मुलांचे 12वी नंतर  मोलमजुरी कडे वळणारी पावले उच्च शिक्षणाकडे वळतील.

No comments:

Post a Comment

Pages