आंबेडकरवादी कविसंमेलनाने केला विद्रोहाचा आगाज सुप्रसिद्ध कवी यशवंत मकरंद यांची उपस्थिती; साहित्य संमेलनात विद्रोही कवी संमेलन रंगले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 December 2022

आंबेडकरवादी कविसंमेलनाने केला विद्रोहाचा आगाज सुप्रसिद्ध कवी यशवंत मकरंद यांची उपस्थिती; साहित्य संमेलनात विद्रोही कवी संमेलन रंगले

नांदेड: आंबेडकरवादी विचार हाच सम्यक विद्रोहाचा आवाज  आहे. व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत आक्रस्ताळेपणा, तीव्र द्वेष, अश्लीलता, विध्वंसक क्रोध ही अशी काही विद्रोहाची भाषा नसते. प्रेम, अहिंसा, दया  क्षमा, शांती आणि करुणेच्या दिशेने जाणारे मूलभूत वैचारिक मतपरिवर्तन म्हणजे सम्यक विद्रोह होय. सामाजिक, सांस्कृतिक तथा प्रबुद्ध भारताच्या पुनर्रचनेसाठी सम्यक क्रांतीची आवश्यकता आहे, हा विचार आंबेडकरवादी साहित्याने दिला. या आशयाच्या एकापेक्षा एक सरस आणि दमदार कविता सादर करुन आंबेडकरवादी कविंनी विद्रोहाचा आगाज केला. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी यशवंत मकरंद, भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे, श्रावण नरवाडे, राज गोडबोले, मंगेश कदम, विठ्ठल डक, सुरेश हटकर, कोंडदेव हटकर आदींची उपस्थिती होती. 


          सत्यशोधक विचार मंच आणि मानव विकास सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फुले, शाहु आंबेडकरी प्रेरणेचे २० वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात संपन्न झाले. यातील दुसऱ्या सत्रात आंबेडकरवादी विद्रोही काव्य पौर्णिमा आयोजित करण्यात आली होती. या मालेतील सप्तरंगी साहित्य मंडळाची ही ६५ वी काव्य पौर्णिमा असून कवी यशवंत मकरंद यांच्या अध्यक्षतेखाली  संजय भारदे,. तान्हाजी मालुसरे, रुपाली वागरे, सुनील नरवाडे, उषा ठाकूर, प्रशांत गवळे, मनोहर गायकवाड, चंद्रकांत कदम, गोदावरी गायकवाड, प्रकाश झिंझाडे, , अनुरत्न वाघमारे, भीमराव हाटकर यांनी सहभाग घेतला. काव्य पौर्णिमेचे संवादसूत्र सुप्रसिद्ध निवेदक भीमराव हटकर यांनी हाती घेतले तर आभार श्रावण नरवाडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages