अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 21 December 2022

अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


नागपूर, दि.21 : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू, असे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. निलम गोऱ्हे यांनी कृती समिती शिष्टमंडळाला दिले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, अंबाझरी, बचाव कृती समितीच्या सदस्यांनी  आमदार अमोल मिटकरी व समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांच्या नेतृत्वात विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन दिले.


या निवेदनात नमूद केल्यानुसार नागपुरातील अंबाझरी तलावाशेजारील शासकीय ४४ एकर जागेत उद्यान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह ५७ वर्षांपासून अस्तित्वात होते. मात्र सध्या ही जागा खाजगी कंपनीला ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली असून, या कंपनीने जुलै २०२१ मध्ये कोणालाही कल्पना न देता येथील आंबेडकर भवन हटविले. कंत्राटदाराच्या  ताब्यातून ही जागा सोडविण्यासाठी या बचाव कृती समितीने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.


उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजून घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला व योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


याप्रसंगी समितीचे पदाधिकारी डॉ. धनराज डहाट, डॉ. सरोज आगलावे, सुधीर वासे, बाळू घरडे, वर्षा शामकुडे, सिद्धार्थ उके, राहुल परुळकर, रामभाऊ आंबूलकर, प्रताप गोस्वामी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages