भिमाकोरेगावचा रणसंग्राम - बालासाहेब लोणे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 31 December 2022

भिमाकोरेगावचा रणसंग्राम - बालासाहेब लोणे

पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी एक निर्णायक लढाई झाली. संपूर्ण जागतिक स्तरावर लढल्या गेलेल्या सर्वाधिक महत्वाच्या दहा लढायांत भिमाकोरेगावच्या ऐताहातिसिक लढाईचा समावेश होतो. केवळ ५०० महार सैनिकांनी २८ हजारापेक्षा जास्त सैन्य  असलेल्या पेशव्यांचा दारुण पराभव केलेला होता. भिमाकोरेगावच्या ऐताहासिक लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रजांच्या विरुध्द पेशवे असे असले तरिही प्रत्यक्षात इंग्रजांच्या बाजुने लढणारे ५०० महार सैनिक आणि २८ हजारांपेक्षा जास्त पेशव्यांमध्ये झालेली आहे. इंग्रजांनी ५०० महार सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते.

       भिमाकोरेगावच्या या निर्णायक लढाईने भारताची भावी दिशा निश्चित केलेली आहे. महार लोक पारंपारिकरित्या अतिशय पराक्रमी व लढवय्यी जमात आहे. स्वराज्याच्या अनेक लढायात त्यांनी मोठा पराक्रम गाजविला होता. परंतू धर्मांध पेशवाईने त्यांचा कायम उपमर्द केला. त्यांना सैन्यात प्रवेश सोडा साधे जीवन जगतानाही अतोनात हाल,अपेष्ठा व पशूहीन जगणे त्यांच्या वाटयाला आणले होते. उलट इंग्रजांनी महारांचा  पराक्रम पाहुन इंग्रजी सैन्यात सामावून घेतल्यामुळे महार जातीचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले होते. परंतू धर्मांध पेशव्यांनी दिलेली पशूहीन वागणूक, अपमान, गावकुसाबाहेरचे लाचारीचे जिणं ही स्वाभिमानी जमातीच्या कायम जिव्हारी लागलेले होते. अन योग्य संधीची वाट पाहत होते ते इंग्रजांचे  साम्राज्य भारतात  विस्तारण्यासाठी नव्हे, तर जुल्मी, धर्मांध, सनातन, जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते.

       भिमाकोरेगावच्या लढाईत मर्दुमकी गाजविण्याची व बहुजन समाजावरील अन्यायाचा बदला घेणाची संधी चालून आली. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या २८ हजारांपेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी शिदनाक महार यांच्या नेतृत्वाखालील केवळ ५०० महार रेजीमेंटच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ५६ पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या दारूण दारुण पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या १६  तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर संपूर्ण पराभव पत्करण्याची वेळ आली. १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा  करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर महार रेजमेंटने कब्जा केला.

     भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला. शिदनाक महार यांच्या नेतृत्वाखालील महार सैनिक इंग्रजाच्या विजयासाठी नाही तर पेशवाईत आपल्यांसह बहुजन समाजाला झालेला त्रास, अपमान, हीन व तुच्छतेची वागणूक बहुजन समाजातील भावी पिढयांना होवू नये, यासाठी जुल्मी, अत्याचारी व धर्मांध सनातनी पेशवाई बुडविण्यासाठी निकराने लढले. महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या अनेक सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत स्वतःच्या प्राणांचीही आहुती दिली व १ जानेवारी १८१८ रोजी अशक्यप्राय वाटणाऱ्या भिमाकोरेगावच्या लढाईत पूर्ण विजय मिळवून सनातनी  जात्यांध व धर्मांध पेशवाई कायमची बुडविली.

      या शूरविर महार सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तिरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत. ५०० महार सैनिकांनी त्यांच्यापेक्षा संख्येने ५६ पट अधिक म्हणजे २८ हजारा पेक्षा जास्त असलेल्या पेशव्यांच्या सैन्याला आपल्या शौर्याच्या बळावर अनेकांना कापून काढले. पेशव्यांचा संपूर्ण पराभव केला. भीमा नदीच्या तीरावर महारांनी पेशवाई बुडविली याचा हा शौर्याचा इतिहास आहे.    १ जानेवारी १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भिमाकोरेगांव येथील क्रांतीस्तंभाला आपल्या सहकार्यांसह भेट देवून मानवंदना दिली व त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. येथे बाबासाहेब  म्हणाले की, महार रेजमेंटचे ५०० सैनिक इंग्रजासाठी वा इनाम मिळविण्यासाठी  लढले नव्हते तर ही जुल्मी, ' अत्याचारी, धर्मांध, सनातनी पेशवाई कायम बुडविण्यासाठी ते लढले व स्वतःच्या प्राणांची बाजी लावून पेशवाई कायमची बुडविलीच. तुम्ही शुरविरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भिमा कोरेगावला जावून बघा तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेडबकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर

     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १ जानेवारी १९२७ च्या या मानवंदने नंतर दरवर्षी १ जानेवारीला  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लाखों अनुयायी भिमा कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.भिमाकोरेगाव क्रांतिस्तंभाच्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे, त्या ठिकाणी नतमस्तक होतात. आपल्या शूरविर पुर्वज सैनिकांना मानवंदना देतात. या शूरविरांच्या स्मरणार्थ दरवर्षी १ जानेवारी हा दिवस "शौर्यदिन" म्हणून साजरा केला जातो.*

      भिमाकोरेगांव क्रांतिस्तंभ स्वातंत्र्य समता व न्यायाचे प्रतिक आहे. करो या मरो या जिवाच्या आक्रांताने शिदनाक महार यांच्या नेतृत्वाखालील ५०० महार सैनिक निडरपणे लढले, अनेकांनी हौतात्म्यही पत्करून समस्त बहुजन समाजाला पेशवाईच्या पाशवी जोखडातून कायमची मुक्ती मिळवून दिली. त्या सर्व स्वाभिमानी शूरविरांना भावपूर्ण आदरांजली. आपणांस १ जानेवारी शौर्य दिन व नविन वर्षच्या खूप खूप मंगल कामना.

बालासाहेब लोणे, नांदेड ©️

9421756489 (Wts) /  8975401662


No comments:

Post a Comment

Pages