नांदेडात उसळला ‘भीमसागर’ अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 14 April 2025

नांदेडात उसळला ‘भीमसागर’ अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन




भीम जयंती निमित्य काढ्यात आलेल्या मिरणुकीतील देखावे लक्ष वेधून घेत होते.


नांदेड : 


घटनाकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अवघे नांदेड शहर भीममय झाले होते़ ओसंडून वाहणारा उत्साह़़ हातात निळे झेंडे आणि बाबासाहेबांचा जयघोष शहरभर दिसत होता़. रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या डॉ़.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ठिकाणी अभिवादनासाठी भीमसैनिकांची अलोट गर्दी होती़. शहराच्या विविध भागातूनही वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या. यामध्ये अबालवृद्धांसह महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.जयंतीनिमित्ताने सर्वच बाजूनी भीम अनुयायी शहरात दाखल होत होते. जयंती मंडळाबरोबरच विविध संस्था, संघटनाच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. सिडको परिसरातील आंबेडकरवादी मिशन ने आयोजित केलेल्या १८ तास अभ्यास उपक्रमाच्या माध्यमातूनही हजारो विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करुन बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले. 



भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना अलोट जनसागराने मिरवणुका, प्रभात फेऱ्या तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले. नांदेडसह जिल्ह्यात महामानवाच्या जयंतीचा जल्लोष पहायला मिळाला़ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून अनुयायांनी गर्दी केली होती. दुपारनंतर विविध भागातून निघालेल्या मिरवणुकांमध्ये डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता.चौकाचौकांत संस्था संघटनांनी मोफत पाणी पाऊच, शरबत आणि खिचडी वाटपाची दालने लावली होती. 

दरम्यान, डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी रात्री बाराच्या ठोक्याला रेल्वेस्टेशन परिसरातील पुतळा परिसरात फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली.यावेळी शासकीय कार्यालये, घरांवर विद्युत रोषणाईचा झगमगाट होता़.सोमवारी पहाटेपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक घराबाहेर पडत होते. नजर जाईल तिथपर्यंत जणू निळा सागरच पसरला होता.




जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी  मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,   समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले,  मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक, क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, गौतम कवडे, सुमेध बनसोडे, साहेबराव ढगे, कॉ.गणेश शिंगे व आंबेडकरी अनुयायांच  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages