किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी: निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 14 April 2025

किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी: निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

किनवट : महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज(ता .१४)शहरासह गोकुंद्यात विविध ठिकाणी  उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास संपन्न झाला.

     प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्याहस्ते पंचशिल ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी  अनिल उमरे यांनी ध्वज गीत घेतले.नंतर उपस्थित  भिक्खुनी सामुहिक वंदना घेतली. उपस्थित मान्यवरांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याठीकाणी ॲड.सुनिल येरेकार व अंकुश भालेराव यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले.     

सिद्धार्थनगरातील जेतवन बुद्ध विहारात सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार  यांच्या हस्ते ध्वजारोहण ह

झाले.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले .त्रिसरण, पंचशिल व सामुहिक वंदनेनंतर भोजनदान करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली.

 शिव - शाहू - फुले - आंबेडकर - अण्णाभाऊ विचारमंचा द्वारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात श्रीकांत देशमुख, सुप्रसिध्द कवी व कथाकार यांचे व्याख्यान होणार आहे.जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमास विविध पक्ष,संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, डॉक्टर,वकील, लोकप्रतिनिधी यांच्यासह समाजातील सर्व  स्तरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यात महीला व बालकांचा सहभाग लक्षणीय होता. जयंतीच्या पूर्वसंध्येला ता.१३ रोजी रात्री १२ वाजता डॉ . आंबेडकर पुतळ्याजवळ व  रमामाता चौकात फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी बाजी करण्यात आली. यावेळी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे,किनवट वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages