महापालिकेच्यावतीने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 14 April 2025

महापालिकेच्यावतीने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांना अभिवादन

नांदेड - नांदेड वाघाळा शहर  महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता *“बोधिसत्व प.पू.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर”* यांच्या १३४ व्या जयंती निमित्त त्यांच्या रेल्वे स्टेशन जवळील पूर्णकृती पुतळ्यास *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी *जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले* यांची विशेष उपस्थिती होती.


बाबासाहेबांना अभिवादन करण्यापुर्वी भदन्त यांनी त्रिशरण पंचशील आष्टगाथेचे सामुहिक पठन करून बाबासाहेबांना वंदन केले. तदनंतर उपस्थित बौद्ध अनुयायांना मनपा आयुक्तांनी संबोधित करतांना बाबासाहेबांचे कार्य प्रेरणा देणारे असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.त्यांनी संविधानात सामाजिक न्याय, समानता आणि हक्कांना विशेष महत्त्व दिले. बाबासाहेबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अशा या महामानवाची जयंती त्यांच्या अनुयायांनी प्रशासनास सहकार्य करत उत्साहात साजरी करावी असे प्रतिपादन यावेळी आयुक्तांनी केले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक, क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, गौतम कवडे, सुमेध बनसोडे, साहेबराव ढगे, कॉ.गणेश शिंगे व आंबेडकरी अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                   

                                                                  

No comments:

Post a Comment

Pages