नांदेड ,14 - लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद व प्रजासत्ताक ही मूल्ये केवळ भारतीय संविधानाचे तत्त्व नाहीत, तर आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचे मार्गदर्शक आहेत. ही मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी जयंती मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, वरिष्ठ लेखाधिकारी विशाल हिवरे, शिक्षणाधिकारी नियोजन दिलीप बनसोडे, जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंद्रे आदींची मंचावर उपस्थिती होती.
सीईओ मेघना कावली पुढे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता आणि न्याय यांचे महत्व आपल्या कार्यातून दाखवले. मूकनायक सारख्या माध्यमातून त्यांनी वंचितांचा आवाज बुलंद केला. आज प्रशासनात कार्यरत प्रत्येक व्यक्तीने बाबासाहेबांसारखे मूकनायक होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने झाली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अन्नदान व पाणीवाटप उपक्रमांचे उद्घाटन सीईओ मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष रनजित गजभारे यांनी केले. सचिव धनंजय गुमलवार व बाबुराव पुजरवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे तर उपस्थितांचे आभार राघवेंद्र मदनुरकर यांनी मानले.
यावेळी बापुराव जमदाडे व त्यांच्या संचाच्या भीमगीत गायनाचे उद्घाटनही मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते झाले. यावेळी गायीका नालंदा सांगवीकर, विकास गायकवाड, चंदा सूर्यवंशी यांनी एकापेक्षा एक बहारदार भीम गीते सादर केली. या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास उप शिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, अधीक्षक येरपुरवार, विस्तार अधिकारी जीवन कांबळे, व्ही. बी. कांबळे, पवन तलवारे, बालाजी नागमवाड, राघवेंद्र मदनुरकर, गजानन श्रीरामवार आनंद सावंत, शुभम तेलेवार, दीपक महालिंगे, मारुती वाडेकर, प्रल्हाद थोरवटे, प्रदीप परोडवाड, मंगेश ढेंबरे, उमाकांत हाळे, संतोष राऊत, विक्रम रेनगुंटवार, बजरंग तेलंग, योगेश वाघ, शिवराज कोल्हे, शंकर तुमोड दुलबा, शिवाजी वैद्य, मोहन हटकर, प्रकाश परदेशी, राजू गोवंदे, शेख जाफर, वडजे, राजरत्न ढोले, विजय कदम, गोविंद गजेवार, कोकेवार, पांचाळ, पेदेवाड, राहुल झगडे, लक्ष्मीकांत मोटरवार, आराधे, सतीश जकाते, नितीन पाम्पटवार, पोकळे, विद्या लोणे, छाया कांबळे, प्रेमला चौदंते, उज्वला गजभारे, बलजीत कौर, सुनील कदम, खानजोडे, सुदर्शन मस्के, राजकुमार बोचरे, बोधनकर, डांगे, कमल दर्डा, रवी जाधव, बालाजी वडजकर, गणेश शिंदे, रणवीरकर, ऋषिकेश धर्मापुरीकर, डॉ. नंदलाल लोकडे, डॉ. विलास ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment