छत्रपती संभाजीनगर :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी 'आंबेडकरी जलसा'त चार महाविद्यालयाच्या संघानी सादर केला. या कला प्रकारास रसिकांची मोठी दाद मिळाली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७ ते १४ एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त आंबेडकरी जलसा' शनिवारी सादर झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. वेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ चंद्रकांत कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'आंबेडकरी जलसा हा कार्यक्रम शनिवारी (दि.१२) सायंकाळी विद्यापीठ नाटयगृहात सादर झाला. यामध्ये विद्यापीठाचा संगीत विभाग, देवगिरी महाविद्यालय, सावरकर महाविद्यालय व मिलिंद कला महाविद्यालयाचे संघ सहभागी होतील, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment