नांदेड, 15 एप्रिल – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात अभूतपूर्व उत्साहाने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात दिनांक 14 एप्रिल रोजी पोर्णिमा नगर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संजय नरवाडे व त्यांच्या परिवाराच्या वतीने अन्नदान, मिठाई व मिनरल वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमाचे हे सलग 17 वे वर्ष आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांनी समता, बंधुता व न्यायाच्या मूल्यांना चालना दिली. त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित व शोषित घटकांसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सेवा हीच खरी श्रद्धांजली या भावनेतून नरवाडे परिवार दरवर्षी अन्नदानाचा उपक्रम सातत्याने राबवत आहे.
या अन्नदान उपक्रमाद्वारे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना, गरजू नागरिकांना व स्थानिकांना विनामूल्य अन्न, मिठाई आणि मिनरल वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. उपक्रमात युवा उद्योजक बाबुराव कसबे यांच्यासह नरवाडे व कसबे परिवारातील सदस्य व मित्र मंडळ यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment