डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 15 April 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान संपन्न


किनवट  : एकिकडे फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायचे तर,दुसरीकडे त्यांच्या विचारांच्या विरूद्ध आचरण करायचे अशा प्रवृत्तींच्या लोकांची संख्या वाढली आहे.यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा या काळात अल्प असलो तरी निर्धाराने आपल्या परीने आपल्याला कार्य करत रहावे लागेल,असे प्रतिपादन श्रीकांत देशमुख यांनी केले.

   शिव - शाहू - फुले - आंबेडकर - अण्णाभाऊ विचारमंचा तर्फे विश्वरत्न महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल(ता.१४) रात्री साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात  आले होते.यावेळी  सुप्रसिध्द कवी व कथाकार श्रीकांत देशमुख हे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी रुग्णालय परिवाराचे डॉ. अशोक बेलखोडे हे होते, तर उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष इसा खान हे उपस्थित होते. विचार  मंचावर सत्यशोधक  विचारवंत  प्रा. रामप्रसाद तौर यांची प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थिती होती. शिव- शाहू- फुले- आंबेडकर अण्णाभाऊ विचारांच्या अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.सूत्रसंचालन प्रा.दगडू भरकड यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा.शिवदास बोडके यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages