भीमसैनिकांच्या तीव्र विरोध पाहुन विद्यापीठ प्रशासन नमले; सुशोभिकरणाच्या नावावर सुरू असलेले प्रती गेटचे पुर्ण बांधकाम पाडले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 December 2022

भीमसैनिकांच्या तीव्र विरोध पाहुन विद्यापीठ प्रशासन नमले; सुशोभिकरणाच्या नावावर सुरू असलेले प्रती गेटचे पुर्ण बांधकाम पाडले

औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमानी समोर सुशोभीकरणाच्या नावावर जानिवपूर्वक उभारण्यात येत असलेल्या अवाढव्य प्रती गेटचे काम भीमसैनिकांच्या विरोध पाहुन प्रशासनाने पुर्ण काढ़न्याचे आदेश दिले यामुळे भीमसैनिकांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आले होते परंतु केवळ प्रती गेटचा एकच कॉलम निष्काशित केला व उर्वरीत दोन कॉलम तसेच ठेऊन उर्वरित दोन कॉलम काढनार नाही असा जातीवादी पवित्रा घेणार्या व दिलेला शब्द फिरवुन आंबेडकरी चळवळीची फसवणुक करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा कुटील डाव भीमसैनिकांच्या वतीने हानून पाडन्यात आला. वेळोवेळी यासाठी पाठपुरावा करुण तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा देत प्रशासनाला समस्त आंबेडकरवादी भीमसैनिकांच्या वतीने धारेवर धरण्यात आले होते, सुशोभीकरनाच्या नावावर अगोदर ऐतिहासिक विद्यापीठ कमानीचे महत्व कमी करण्याच्या हेतुने कमानीसमोर तयार करण्यात येणारे भव्य प्रती गेट पुर्ण काढून घेण्याचा शब्द देऊन केवळ एकच काॅलम काढत उर्वरित दोन कॉलम काढनार नाही असा पवित्रा घेणाऱ्या कुलगुरु प्रमोद येवले यांना वेळोवळी पून्हा आंबेडकरी भीमसैनिकांकडून धारेवर धरत जाब विच्यारण्यात आला. जो पर्यंत प्रती गेटचे उर्वरित पुर्णबांधकाम दोन कॉलम तात्काळ काढून घ्या.अन्यथा होनाऱ्या परिणामाची जबाबदारी स्विकारा असे ठनकाऊंन सांगताच आज प्रतीगेटचे झालेले  बांधकाम पुर्णपणे पाडण्यास सुरुवात करण्यात आले व ते पुर्णपने पाडे पर्यंत भीमसैनिक त्याठिकानिच उभे राहिले व महापुरुष्यांच्या नावे नामांतर शहीदांच्या नावे गगन भेदी घोषणा देऊन संपूर्ण विद्यापीठ परिसर दनानुन सोडला,  प्रतिगेट पाडल्या नंतर भीमसैनिकानी पेढ़े वाटून जल्लोष केला. हा लढा  आस्मीतेचा, समाजाच्या अस्मीतेवर जेव्हा जेव्हा हल्ला होण्याचा प्रयत्न होनार तो प्रयत्न  आंबेडकरी एकजुटिने हानुन पाडनार. असा प्रण यावेळी घेण्यात आला.

यावेळी दीपक निकाळजे यांनी या लढ्यात उपस्थित सर्व भीमसैनिकांचे जाहीर धन्यवाद आभार मानले, व यापुढेही भीमसैनिकांनी अशीच एकजुट कायम ठेवा असे आवाहन केले या महत्त्वपूर्ण अस्मीतेच्या लढ्यात कशाचीही पर्वा न करता सूर्यकांताताई गंगाधर गाड़े, दीपक निकाळजे, सय्यद तौफीक, अरुण शिरसाठ, राजु साबळे, स्वप्निल शीरसाठ, आनंद कस्तूरे, शिद्धोधन मोरे, सोनू नरवडे, कपिल बनकर, प्रकाश इंगले, अतुल कांबले, सम्यक सर्पे, विकास रोड़े,किरण मांदळे, सचिन शिंगाड़े, सचिन जोगदंडे, गोल्डी मगरे, बाबासाहेब बोर्डे, बुद्धभुषण निकालजे, अवि डोंगरे, सन्नी ओहाल, संकेत कांबले, संदीप रगड़े, व शहरातील असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages