आत्मसन्मान व स्वाभिमानाचा लढा : भिमाकोरेगाव - निलेश वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 December 2022

आत्मसन्मान व स्वाभिमानाचा लढा : भिमाकोरेगाव - निलेश वाघमारे


     "आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या  मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिध्द केलेला आहे. आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकावली पाहिजे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर(४ जून १९२७ मुंबई)"जगाच्या इतिहासात हजारोंच्या संख्येने लढाया झाल्यात. त्यामध्ये प्रत्येक लढाईचे एक उद्दिष्ट होते . काही लढाया सत्ता संपत्तीसाठी काही राज्य विस्तार करण्यासाठी काही लढाया पराक्रमाची शर्थ म्हणुन लढल्या गेल्या . परंतु भिमाकोरेगांवच्या लढाईचे एक वेगळेच उद्दिष्ट व वैशिष्ट्य दिसते जागतिक युद्धाच्या  इतिहासात अशा प्रकारची लढाई क्वचितच पाहायला मिळेल.भीमा कोरेगावच्या लढाईत ब्राम्हणशाहीचे प्रतिक असलेल्या पेशव्यांच्या हजारो सैनिकांचा निप्पात करणारा...१ जानेवारी १८१८ चा भीमा कोरेगावचा लढा जागतिक शौर्याचा इतिहास कोरणा-या लढ्यापैकी आहे यात महारांचा पराक्रम अतिशय विलक्षण आहे“ महारांच्या शौर्य गाथा इतिहासात कोरून ठेवलेल्या आहेत १६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानावर त्यांना रुजू केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून ख-या अर्थाने महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत, राज्य विस्तारात, राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांनी मोठी भूमिका बजावल्याचे इतिहासाच्या पानापानातून दिसून येते. परंतु महार जात शूर, पराक्रमी, लढवैय्यी असतांनाही चातुर्वर्ण्यांच्या अतिशुद्र वर्गवारीत टाकण्यात आल्याने सदैव दुर्लक्षित केली गेली. परंतु याची तमा न बाळगता महारांनी सदैव आपल्यातील शौर्याच्या बळावर या देशावर अधिराज्य गाजविले आहे. शिवाजी महाराजानंतर अनेकांनी महार सैन्यांच्या बळावर युद्ध जिंकली आहेत. 

१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील या पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट मध्ये महार बटालियन ची स्थापना केली . व त्या लढाईत महारांना सामील करवून घेतले याच तुकडीच्या बळावर ब्रिटिशांनी भिमाकोरेगाव ची लढाई लढली आहे.

 १ जानेवारी १८१८ रोजी भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे बाजीराव पेशवा व त्याचे साथीदार बापू गोखले यांच्यासह २८००० सैन्यासह भीमा नदीच्या काठावर उपस्थित होते व दुसऱ्या बाजुस ब्रिटिश सैन्याचा कॅप्टन फ्रान्सिस .एफ. स्टॉटन आपल्या बॉम्बे नेटिव्ह इन्फट्री च्या पहिल्या रेजिमेंट ची दुसऱ्या तुकडीसह  उपस्थित होता. या तुकडीमध्ये बहुसंख्य सैनिक हे महार जमातीचे होते. यात ५०० पायदळ सैनिक , पूना हॉर्स कंपनीचे २५० घोडेस्वार , मद्रास तोफखान्याचे २४ ब्रिटिश अधिकारी व गवर्नर होते  या बटालियन चा प्रमुख कॅप्टन स्टॉटन आपल्या सैन्यासोबत २५ मैलाचे अंतर चालून १ जानेवारी १८१८ ला सकाळी ८ वाजता कोरेगाव ला पोहचला सकाळी ९: ३० वाजता पेशवा व ब्रिटिश सैन्याची भेट भीमा कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठावर घडली  पेशव्याच्या तुलनेत लढाईसाठी  सैन्यबळ कमी होते व ही लढाई सपाट जमिनीवर असल्याने ही आश्चर्यजनक बाब होती पेशव्याच्या सैन्यापुढे ब्रिटिशाचे मूठभर सैन्य लढावयास सज्ज झाले मुळातच जन्मजात निधड्या छातीच्या शुर, स्वाभिमानी सैनिकांनी पेशव्यांना पळता भुई थोडी केली पेशव्याच्या सैन्याची दाणादाण उडवून पेशवाईचा दारुण पराभव केला या महार सैनिकाच्या अतुल्य पराक्रमामुळे ब्रिटिशांचा विजय झाला त्या दिवसापासून युनियन जॅक (ब्रिटिश ध्वज) शनिवार वाड्यावर फडकवण्यात आला व महारांनी अस्मितेसाठी लढलेल्या लढाईचे त्यांना फळ मिळाले म्हणुनच या सैनिकांची महान ऐतिहासिक शौर्य गाथा इतिहासात कोरली गेली याच लढाईची दखल घेत दस्तुरखुद्द ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला.

 ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी ज्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले त्याबद्दल त्यांना भरपूर मोबदला मिळाला. कोणाला जहागिऱ्या , कोणाला जमिनी , धनसंपत्ती मिळाली. शनिवारवाड्यावर ६ नोव्हेंबर , १८१७ रोजी ब्रिटिशांचे युनियन जॅकबावटा हे निशाण ( झेंडा ) लावल्याबद्दल बाळाजी नातू या ब्राह्मणास सरदारकी मिळाली. पेशव्यांच्या सरदारांना संस्थाने आणि जहागिऱ्या मिळाल्या. परंतु ज्या शूरवीर महारांनी युद्धात स्वतःचा प्राण अर्पण करून ब्रिटिशांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्याबद्दल त्यांना कोरेगाव येथे दगडांचा ' विजयस्तंभ ' मिळाला. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी कोरेगावच्या 

 १ जानेवारी , १८१८ च्या युद्धात जखमी आणि धारातीर्थी पडलेल्या महार सैनिकांनी जे शौर्य गाजविले त्या अभूतपूर्व मर्दुमकीची कीर्ती जगात अजरामर राहावी यासाठी महार सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य ' विजय स्तंभ ' उभारला आहे. पूर्वी या स्तंभाला ' महार स्तंभ ' असे नाव होते . हा विजयस्तंभ पुणे - नगर ( मुख्य ) रस्त्यापासून १५० फूटावर आहे. १५० फूट x २०० फूटाच्या जागेत पूर्व - दक्षिण व उत्तर या दिशांना दगडी चार फूट उंच असे कंपाऊंड टाकलेले आहे . पश्चिमेच्या बाजूने तारेचे लोखंडी कंपाऊंड आहे. त्याच बाजूने लोखंडी दार आहे . दारावर लोखंडी नक्षीदार कमान आहे . या कंपाऊंडच्या मध्ये मध्यभागी ३३ फूट x ३३ फूट मापाच्या ३ फूट उंचीच्या चौकोनी चौथऱ्यावर १३ फूट लांब या मापाचा 

 ७५ फूट उंच असा भव्य विजयस्तंभ उभारलेला आहे. तो वरती निमुळता होत गेलेला आहे. पश्चिम बाजूने चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्यामुळे स्तंभाची मुख्य बाजू पश्चिमेची आहे. हा स्तंभ संपूर्ण दगडांनी बांधलेला आहे. त्याचे पूर्व व पश्चिम बाजूस इंग्रजी लिपीत युद्धात शौर्य गाजविलेल्या धारातीर्थी पडलेल्या शूर महार सैनिकांची नावे शिलालेखावर अंकित आहेत. तसेच दक्षिण व उत्तर बाजुला मराठी भाषेतील लिपीत शिलालेखावर युद्धात धारातीर्थी पडलेल्या महार सैनिकांची नावे लिहिलेली आहेत. महार लोकांच्या नावापुढे पूर्वीच्या काळी ' नाक ' हा प्रत्ययः पद लावलेले आहे. लावत असत . त्यामुळे त्या महार सैनिकांच्या नावापुढे ' नाक ' या विजयस्तंभावर एका बाजुला जखमी व कामास आलेल्यांची नावे इंग्रजी व मराठी भाषेत कोरलेली आहेत स्तंभाच्या पूर्वेकडील बाजूवरील शिलालेख एकंदर २३ महार शिपायांपैकी २० ठार झालेले व ३ जखमी झालेले. 

 त्यांची नावे पुढीलप्रमाणे 

 १ ) सोमनाक कमलनाक नाईक , 

 २ ) रामनाक येमनाक नाईक ( पुढील १८ जण शिपाई होते ) ३ ) गोदनाक कोठेनाक 

 ४ ) रामताक येसनाक 

 ५ ) भागनाक हरनाक 

 ६ ) अंबनाक काननाक 

 ७ ) गणनाक बाळनाक 

 ८ ) बळनाक कोंडनाक  

 ९ ) रूपनाक लखनाक 

 १० ) वपनाक रामनाक  

 ११ ) विटनाक धामनाक  

 १२ ) राजनाक गणनाक  

 १३ ) वपनाक हरनाक 

 १४ ) रैनाक वाननाक  

 १५ ) गणनाक धर्मनाक  

 १६ ) देवनाक आननाक  

 १७ ) गोपाळनाक बाळनाक 

 १८ ) हरनाक हीरनाक 

 १९ ) जेटनाक चैनाक 

 २० ) गणनाक लखनाक 

 पुढील तीन शिपाई जखमी झाले- 

 १ ) जाननाक हीरनाक 

 २ ) भीकनाक रतननाक 

 ३ ) रतननाक धाननाक  

 स्तंभाच्या पश्चिमेकडील बाजूवरील शिलालेख कोरेगावच्या विजयाबद्दल भीमा नदीच्या तीरावर इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला . त्यांच्या एका बाजुला जखमी व कामास आलेल्यांची नावे इंग्रजी व मराठी भाषेत कोरलेली आहेत आणि त्याच्या पश्चिमेच्या बाजूवर इंग्रजीत विजयलेख कोरलेला आहे, 

 असा One of the proudest triumphs of British Army in the East ' 3 ( पूर्वेकडील देशातील ब्रिटीश सैनिकांचा सर्वात गौरवशाली विजय ) या विजयस्तंभाला दरवर्षी नूतनवर्षाच्या आरंभीच्या १ जानेवारीला मिलिटरी सैन्याची एक बटालियन मानवंदना देण्यासाठी येत असते. तेव्हा या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपणही आपल्या कार्यकर्त्यांसोबत जावे , हा संकल्प बाबासाहेबांच्या मनात होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी या भीमाकोरेगाव विजय स्तंभाला भेट दिली व त्या योध्यांना मानवंदना दिली व पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा दिला  बाबासाहेबआंबेडकर आपल्या २५ डिसेंबर १९२७ च्या महाडयेथील भाषणात म्हणतात की, "तुम्ही शुर विरांचे संतान आहात हि गोष्ट काल्पनिक न्हवे, तर भीमाकोरेगाव ला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात". त्या दिवसापासून दरवर्षी अनुयायी येत असतात हा स्तंभ येणारी शेकडो शतके समाजाला ऊर्जा, प्रेरणा, तथा स्वाभिमानाची साक्ष देत राहील.

 - निलेश वाघमारे 8180869782 नांदेड

No comments:

Post a Comment

Pages