महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथिल खेळाडुची राज्यस्तर शालेय तायक्वाँदो स्पर्धेत निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 December 2022

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथिल खेळाडुची राज्यस्तर शालेय तायक्वाँदो स्पर्धेत निवड

किनवट :

नुकत्याच 27 डिसें.2022  रोजी लातुर येथे पार पडलेल्या शालेय  तायक्वाँदो विभागस्तर स्पर्धेत महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च मा.वि.गोकुंदा ,किनवट ,ता.किनवट जि.नांदेड येथिल 19  वर्षा खालील मुलींच्या  40 किलो ग्राम गटात कु.वर्षा भुमा चौधरी तर 42 किलो ग्राम गटा मध्ये ऐश्वर्या साहेबराव नरवाडे यानी विभाग स्तर शालेय स्पर्धेत प्रथम क्रंमाक पटकावला आणि कांही दिवसातच होऊ घातलेल्या राज्यस्तर स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली दोघींच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.प्रशांतजी ठमके साहेब तसेच कोषाध्यक्षा सौ.शुभांगीताई ठमके तसेच महात्मा ज्योतिबा फुले ज्युनियर कालेजचे प्राचार्य शेख हैदर  सर उपप्राचार्य सुभाष राऊत सर उपमुख्याध्यापक पठाण जुम्माखाँ सर प्रर्यवेशक ठाकुर सर डांगे सर मुनेश्वर सर यानी विजयी खेळाडु व त्यांच्या मार्गदर्शकाचे कौतुक केले व होऊ घातलेल्या राज्यस्तर स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages