किनवट तालुक्यातील दोन खेळाडूंची बॉक्सिंग स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 26 December 2022

किनवट तालुक्यातील दोन खेळाडूंची बॉक्सिंग स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

किनवट, दि.25 (प्रतिनिधी) :  लातूर येथे दिं. 20 रोजी झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातून  येथील कॉस्मापॉलिटन विद्यालयाच्या संचिता लक्ष्मण वाडगुरे तर शासकीय आश्रम शाळा सारखणी येथील जगदीश शेडमाके या खेळाडूंची बॉक्सिंग(मुष्टीयुद्ध) स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल उपविभागीय अधिकारी नेहा भोसले व तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


       यांच्या सोबतच तालुक्यातील कार्तिक जाधव, रंजीत पवार, पल्लवी चव्हाण, प्राजक्ता दरडे, संदेश कनाके, विशाल तरडे, पृथ्वी धुर्वे, पवन कुसराम, नामदेव गेडाम, गणेश कोरंगे, किरण गुवाडे, तुषार गेडाम, सुरज टेकाम या विद्यार्थ्यांनीही विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.


         या सर्व विद्यार्थ्यांच्या यशापाठीमागे क्रीडा शिक्षक एनआयएस कोच संदीप यशीमोड असून, बाळकृष्ण कदम, लक्ष्मण वाडगुरे या शिक्षकांनी सुद्धा परिश्रम घेतले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा व विभागीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे कॉस्मापॉलिटन शिक्षण संस्थेचे सचिव पी. व्ही. रामतीर्थकर, अध्यक्ष एन.व्ही. रामतिर्थकर, मुख्याध्यापक आर. व्ही. घोरबांड, कुंभार सर, पर्यवेक्षक आर.आर.बारापात्रे, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी  या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages