औरंगाबाद दि.२५ :
बार्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- २०२१ साठी ९०२ संशोधक विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरवून मूळ कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी शासनाने फक्त २०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मंजूर केली तर उर्वरित विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती पासून वंचित राहावे लागणार आहे. फेलोशिप अभावी विद्यार्थी संशोधन दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करु शकणार नाही. संशोधन कार्य अर्धवट राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- २०२१ साठी मूळ कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संशोधक विद्यार्थी कृती समितीचे ऍड.अतुल कांबळे, सिद्दोधन मोरे, विकास रोडे, अनुप तायडे, यशवंत जाधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment