भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून विशेष व्याख्यान संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 December 2022

भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून विशेष व्याख्यान संपन्न

औरंगाबाद : २५ डिसेंबर मनुस्मृति दहन दिन हाच खरा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने दर वर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 25 डिसेंबर रोजी मिलिंद कॉलेज ऑफ सायन्समध्ये कार्यक्रम आयोजित आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून स्त्रियांना धार्मिक, सामाजिक, पुरुषसत्ताक बंधनातून मुक्त केले होते. त्याचीच आठवण म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने दरवर्षी २५ डिसेंबर रोजी भारतीय स्त्री मुक्ती दिन  साजरा करण्यात येतो. यावर्षी स्त्री मुक्ती दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या तिलोत्तमा झाडे यांनी प्रेम नकार आणि हिंसा या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आजच्या मुलींनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे तरच त्या स्वतः वर असणाऱ्या अदृश्य आणि दृश्य मनुस्मुर्तीतील अनिष्ट रूढीपरंपरांना तोडण्यासाठी ठाम भूमिका घेऊ शकतील. आणि मुलांना कुटुंबातूनच नकार पचवायला शिकवायला हवं अस झाल्यास समाजात सध्या घडतं असणाऱ्या हिंसा घडणार नाहीत. कारण आपल्या समाज पितृसत्ताक असल्यामुळे आपण मुलांना हव ते देत असतो. त्यांना कोणत्याच गोष्टीसाठी नकार देत नाहीत. म्हणून जेव्हा प्रेमातून एखादी मुलगी नाही म्हणते किंवा नकार देते तेव्हा मुलाला नकाराची सवय नसते आणि त्याच्यावर अदृश्य  पद्धतीने काम करत असलेल्या  मनुस्मुर्तीच्या   प्रभावामुळे  हिंसा घडतात. समकालीन स्त्री प्रश्न आणि मनुस्मृती या विषयावर डॉ. सुवर्णमाला मस्के यांनी मांडणी केली. त्या म्हणतात  मनुस्मुर्तीच बाबासाहेबानी दहन 1927 केले  परंतु  आजही अदृश्य पणे  मनुस्मुर्ती आपल्या समाजात घट्ट रोवलेली आहे. म्हणून आजच्या तरुणाईने बाबासाहेबांच्या विचारांचे  implement करणे गरजेचे आहे. तेव्हाच २५ डिसेंबर स्त्री मुक्ती दिन साजरा होईल. फक्त भाषण देऊन काही होणार नाही तर फुले, शाहू, बाबसाहेब, सावित्री, जिजाऊ,  फातिमा, मुक्ता, पेरियार यांच्या विचार आजची तरुणाई अंमलात आणेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिन साजरा होईल  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोध विचारवंत के.ई. हरदास यांनी आपले अध्यक्षय मत  मांडले. ते म्हणतात मनुस्मृतिची मूळ घट्ट होत जात आहेत. त्यासाठी आजच्या तरुणाईने सत्याचा शोध घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांची पुस्तक वाचन गरजेचे आहे. आणि अंतर जातीय विवाह करणे गरजेचे आहे. मुलींनी शिक्षण घेणे गरजेचे आहे, आर्थिकदृष्टया  सक्षम होणे गरजेचे आहे आणि स्वतः साठी जीवनसाथीची निवड करावी  जेणेकरून  आज अदृश्य पद्धतीने काम करणाऱ्या मनुस्मृति विरुद्ध त्या बंड करतील. कार्यक्रमास मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते . यामध्ये   संशोधक विद्यार्थी व शैक्षणिक, सामाजिक  क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकत्यांचा सत्कार सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आला  यामध्ये  पल्लवी वेव्हळ, जया दाभाडे, प्रणाली धनेधर, प्रतिभा मगरे राजू नवघरे, मुकेश नरवडे, सुरज तायडे, समाधान निकम , विकास रोडे ,संध्या पगारे , संगिता सुरेश होलमुखे, आकांक्षा पडघन , दिपक पगारे , भीमराव  सूर्यवंशी , संचिन दाढेल ,देवानंद हनवते, आदिनाथ टोपेवाड ,वीरेंद्र बसवते, अमोल खरात इत्यादी कार्यकर्त्यांचा सत्कार पित्रसत्ताक व स्त्रीमुक्ती ही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष  के.ई. हरदास, वक्ते त्तीलोत्त्तमा झाडे, सोनाली मस्के यांच्या कडून करण्यात आला.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक गंगावणे ,प्रास्ताविक सुरेश सानप व आभार रणजित वायसे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होणासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निशिकांत कांबळे, कार्याध्यक्ष  सहसचिव श्रद्धा खरात, विद्यापीठ अध्यक्ष अजय घाते, अमोल खरात (माजी अध्यक्ष सत्यशोधक विद्यार्थी संघटना) सतीश गायकवाड, सुनील भिसे, पल्लवी पाटील, जयेश पठाडे, , निलकांत केदारकुंठेकर, दीपक पगारे, ,प्रवीण मस्के, स्वाती अदोडे,भीमसेन, बंटी खंदारे, लक्ष्मीकांत जाधव, सुयश नेत्रगावकर , शिमा कदम, इत्यादीं सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages